Join us  

IND vs AUS: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारताच्या ऐतिहासिक विजयाचा विसर

ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी आणि एकदिवसीय मालिका जिंकणारा भारत हा आशियामधला पहिला संघ ठरला. पण पंतप्रधान मोदींना त्याचे सोयरसुतक नसल्याचे दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2019 3:19 PM

Open in App

नवी दिल्ली, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. भारताला पहिल्यांदा ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकता आली. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी आणि एकदिवसीय मालिका जिंकणारा भारत हा आशियामधला पहिला संघ ठरला. विराटसेनेने एवढी देदिप्यमान कामगिरी केली असली तरी ती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गावीही नसल्याचे दिसून आले आहे. कारण मोदी यांनी एका युवा बुद्धिबळपटूला काल शुभेच्छा दिल्या, पण त्यांनी भारतीय संघाबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही.

पंतप्रधान मोदी हे ट्विटरवर सक्रिय असतात. भारतीय संघाने एखादी मालिका जिंकली तर यापूर्वी मोदी यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. पण आता तर भारताने ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन इतिहास रचला. पण पंतप्रधानांनी यावेळी भारतीय संघाचे कौतुक केले नाही.

शुक्रवारी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये एकदिवसीय मालिका जिंकली. शुक्रवारीच भारताचा डी. गुकेश हा सर्वात कमी वयाचा ग्रँडमास्टर ठरला. त्यावेळी पंतप्रधान यांनी गुकेशला ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. पण त्याचवेळी भारतीय संघाला शुभेच्छा द्यायला मात्र ते साफ विसरले.

टॅग्स :नरेंद्र मोदीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहली