Ind vs Aus : रिषभ पंतने मैदानात केला हा खतरनाक स्टंट, व्हीडीओ झाला वायरल

ड्रिंक्स ब्रेक सुरु असताना WWE स्टार शॉन माइकलच्या स्टाइलमध्ये पंतने एक स्टंट केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 06:00 PM2019-01-04T18:00:56+5:302019-01-04T18:02:06+5:30

whatsapp join usJoin us
Ind vs Aus: Rishabh Pant made a dangerous stunt on the field, VIDEO became viral | Ind vs Aus : रिषभ पंतने मैदानात केला हा खतरनाक स्टंट, व्हीडीओ झाला वायरल

Ind vs Aus : रिषभ पंतने मैदानात केला हा खतरनाक स्टंट, व्हीडीओ झाला वायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : चेतेश्वर पुजारा बाद झाल्यावर रिषभ पंपतेन भारताच्या डावाला चांगला आकार दिला. पंतने पहिल्या डावात नाबाद दीडशतक झळकावले. पण त्याचवेळी त्याने मैदानात एक खतरनाक स्टंट केला. या स्टंटचा व्हीडीओ आता चांगलाच वायरल झाला आहे. ड्रिंक्स ब्रेक सुरु असताना WWE स्टार शॉन माइकलच्या स्टाइलमध्ये पंतने एक स्टंट केला आहे.

हा पाहा पंतचा व्हीडीओ


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत खेळाडूंमध्ये शेरेबाजीचे प्रकार रंगलेले पाहायला मिळत आहेत. मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन आणि भारताचा यष्टिरक्षक रिषभ पंत यांच्यात तोडीस तोड शेरेबाजी रंगलेली पाहायला मिळाली. पेनच्या 'बेबिसिटिंग' टोमण्याला पंतकडून 'टेम्पररी कर्णधार' असे उत्तर पाहायला मिळाले. त्यांच्या या स्लेजिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनीही उडी घेतली आणि त्याने गमतीशीरपणे स्लेजिंग करताना पंतचे स्वागत केले.

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी कुटुंबीयांसह पंतप्रधान मॉरिसन यांची भेट घेतली. या दरम्यान मॉरिसन यांनी प्रत्येक खेळाडूशी चर्चा केली. अशाच चर्चेदरम्यान मॉरिसन आणि पंत समोरासमोर आले आणि गमतीदार किस्सा घडला. मॉरिसन म्हणाले,''अच्छा! तुम्हीच स्लेजिंग करता ना? तुमचे स्वागत. आम्हाला स्पर्धात्मक खेळ आवडतो.'' मॉरिसन यांच्या या वाक्यानंतर उपस्थित खेळाडूंना हसू आवरले नाही.

Web Title: Ind vs Aus: Rishabh Pant made a dangerous stunt on the field, VIDEO became viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.