Join us  

Rohit Sharma Team India, IND vs AUS: ऑस्ट्रेलियाला रडवणारी रोहितची 'टीम इंडिया' इतिहास रचणार? 'असा' विक्रम करणारा ठरेल जगातील पहिला देश

ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारतीय संघ कसोटी मालिकेत २-०ने आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 12:20 PM

Open in App

Rohit Sharma Team India, IND vs AUS Test: ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चार सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर मालिकेत भारत २-० ने पुढे आहे. दिल्लीतील दुसरा कसोटी सामना जिंकल्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आता मालिकेत पराभूत नक्कीच होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत भारताचा मानस ही मालिका ४-० ने जिंकण्याचा असेल यात शंका नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना १ मार्चपासून इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया इंदूरमधील तिसरा कसोटी सामना जिंकून इतिहास रचू शकते. असे करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरणार आहे.

रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर

टीम इंडियाने इंदूरमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धचा तिसरा कसोटी सामना जिंकला तर कसोटी मालिका तर जिंकेलच, शिवाय मोठा विक्रमही करेल. भारतीय संघाने बॉर्डर गावस्कर मालिकेत ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यास मायदेशात सलग 16वी कसोटी मालिका जिंकून इतिहास रचला जाईल. सध्या भारताने घरच्या मैदानावर सलग 15 कसोटी मालिका जिंकल्या आहेत, हा एक विश्वविक्रम आहे.

'असे' करणारा भारत जगातील पहिला देश ठरणार!

बॉर्डर गावस्कर मालिकेत ऑस्ट्रेलियाला पराभूत करून भारतीय संघाने मायदेशात सलग 16वी कसोटी मालिका जिंकली तर त्याचा विश्वविक्रम आणखी मजबूत होईल. मायदेशात सलग सर्वाधिक कसोटी मालिका जिंकण्याच्या बाबतीत भारतीय संघाच्या आसपास एकही संघ नाही. नोव्हेंबर २०१२ मध्ये इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाने मायदेशात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. मायदेशात सलग सर्वाधिक कसोटी मालिका जिंकण्याच्या बाबतीत टीम इंडियानंतर ऑस्ट्रेलियाचा क्रमांक लागतो. मायदेशात सलग 10 कसोटी मालिका दोनदा जिंकणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला संघ आहे. मायदेशात झालेल्या गेल्या ४४ कसोटी सामन्यांमध्ये भारताने केवळ 2 सामने गमावले आहेत. त्यामुळे भारतीय कसोटी संघासाठी मायदेश हा अभेद्य बालेकिल्ला आहे.

टीम इंडियाचा भारतातला पराक्रम!

  1. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत - टीम इंडियाने कसोटी मालिका 4-0 ने जिंकली (4) (2013)
  2. वेस्ट इंडिज विरुद्ध भारत - टीम इंडियाने कसोटी मालिका 2-0 ने जिंकली (2) (2013)
  3. दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत - टीम इंडियाने कसोटी मालिका 3-0 ने जिंकली (4) (2015)
  4. न्यूझीलंड विरुद्ध भारत - टीम इंडियाने कसोटी मालिका 3-0 ने जिंकली (3) (2016)
  5. इंग्लंड विरुद्ध भारत - टीम इंडियाने कसोटी मालिका 4-0 (5) ने जिंकली (2016)
  6. बांगलादेश विरुद्ध भारत - टीम इंडियाने कसोटी मालिका 1-0 ने जिंकली (1) (2017)
  7. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत - टीम इंडियाने कसोटी मालिका 2-1 (4) ने जिंकली (2017)
  8. श्रीलंका विरुद्ध भारत - टीम इंडियाने कसोटी मालिका 1-0 ने जिंकली (3) (2017)
  9. अफगाणिस्तान विरुद्ध भारत - टीम इंडियाने कसोटी मालिका 1-0 ने जिंकली (1) (2018)
  10. वेस्ट इंडिज विरुद्ध भारत - टीम इंडियाने कसोटी मालिका 2-0 ने जिंकली (2) (2018)
  11. दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत - टीम इंडियाने कसोटी मालिका 3-0 ने जिंकली (3) (2019)
  12. बांगलादेश विरुद्ध भारत - टीम इंडियाने कसोटी मालिका 2-0 (2) ने जिंकली (2019)
  13. इंग्लंड विरुद्ध भारत - टीम इंडियाने कसोटी मालिका 3-1 (4) ने जिंकली (2021)
  14. न्यूझीलंड विरुद्ध भारत - टीम इंडियाने कसोटी मालिका 1-0 (2) ने जिंकली (2021)
  15. श्रीलंका विरुद्ध भारत - टीम इंडियाने कसोटी मालिका 2-0 ने जिंकली (2) (2022)
  16. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत - टीम इंडिया कसोटी मालिकेत 2-0 (4) आघाडीवर आहे (2023) (मालिकेत 2 सामने बाकी)
टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्माभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलिया
Open in App