IND vs AUS Series : लोकेश राहुल संघात, पण उप कर्णधारपद काढून घेतलं; वन डे मालिकेत हार्दिक पांड्या नेतृत्व करताना दिसणार

India’s squad for 3rd & 4th Test vs Australia - बीसीसीआयने उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी भारताच्या संघाची घोषणा आज केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 05:32 PM2023-02-19T17:32:25+5:302023-02-19T17:32:43+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS Series : India squads for last two Tests of Border-Gavaskar Trophy and ODI series announced, Rohit Sharma will be unavailable for the first ODI due to family commitments | IND vs AUS Series : लोकेश राहुल संघात, पण उप कर्णधारपद काढून घेतलं; वन डे मालिकेत हार्दिक पांड्या नेतृत्व करताना दिसणार

IND vs AUS Series : लोकेश राहुल संघात, पण उप कर्णधारपद काढून घेतलं; वन डे मालिकेत हार्दिक पांड्या नेतृत्व करताना दिसणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India’s squad for 3rd & 4th Test vs Australia - बीसीसीआयने उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी भारताच्या संघाची घोषणा आज केली. लोकेश राहुल ( KL Rahul) याला डच्चू दिला जाईल अशी अपेक्षा होती, परंतु संघ व्यवस्थापन त्याच्या पाठीशी ठाम उभा राहिला. जयदेव उनाडकत पुन्हा संघात परतला आहे.  रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी त्याला रिलीज केले गेले होते. त्याच्या नेतृत्वाखाली सौरष्ट्रने रणजी करंडक उंचावला. भारताच्या वन डे संघाचीही आज घोषणा करण्यात आली. कसोटी संघातील उपकर्णधारपद राहुलकडून काढून घेतलं आहे.

तिसऱ्या व चौथ्या कसोटीसाठीचा संघ -  रोहित शर्मा, लोकेश राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट ( Rohit Sharma (C), KL Rahul, S Gill, Cheteshwar Pujara, Virat Kohli, KS Bharat (wk), Ishan Kishan (wk), R Ashwin, Axar Patel, Kuldeep Yadav, R Jadeja, Mohd Shami, Mohd Siraj, Shreyas Iyer, Suryakumar Yadav, Umesh Yadav, Jaydev Unadkat) 


भारताचा वन डे संघ - India’s ODI squad vs Australia - रोहित शर्मा ( कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उम्रान मलिक, शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट ( Rohit Sharma (C), S Gill, Virat Kohli, Shreyas Iyer, Suryakumar Yadav, KL Rahul, Ishan Kishan (wk), Hardik Pandya (VC), R Jadeja, Kuldeep Yadav, W Sundar, Y Chahal, Mohd Shami, Mohd Siraj, Umran Malik, Shardul Thakur, Axar Patel, Jaydev Unadkat) 

कौटुंबिक कारणास्तव रोहित शर्मा पहिल्या वन डेत खेळणार नाही, त्याच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्या नेतृत्व करेल. 

तिसरी कसोटी - १ मार्चपासून - इंदूर
चौथी कसोटी - ९ मार्चपासून - अहमदाबाद

पहिली वन डे - १७ मार्च - वानखेडे
दुसरी वन डे - १९ मार्च - विशाखापट्टणम
तिसरी वन डे - 22 मार्च- चेन्नई 

Web Title: IND vs AUS Series : India squads for last two Tests of Border-Gavaskar Trophy and ODI series announced, Rohit Sharma will be unavailable for the first ODI due to family commitments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.