Shardul Thakur Ravi Shastri, IND vs AUS: जेव्हा शार्दुल ठाकूरने रवी शास्त्रींचं न ऐकता मैदानात वेगळाच निरोप दिला तेव्हा...; वाचा भन्नाट किस्सा

ऑस्ट्रेलियात घडला होता प्रकार, माजी कोचच्या पुस्तकातून झाला उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 09:12 AM2023-02-06T09:12:46+5:302023-02-06T09:13:48+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS Shardul Thakur did not listen to Ravi Shastri and said something else to R Ashwin Hanuma Vihari in Gabba test | Shardul Thakur Ravi Shastri, IND vs AUS: जेव्हा शार्दुल ठाकूरने रवी शास्त्रींचं न ऐकता मैदानात वेगळाच निरोप दिला तेव्हा...; वाचा भन्नाट किस्सा

Shardul Thakur Ravi Shastri, IND vs AUS: जेव्हा शार्दुल ठाकूरने रवी शास्त्रींचं न ऐकता मैदानात वेगळाच निरोप दिला तेव्हा...; वाचा भन्नाट किस्सा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Shardul Thakur Ravi Shastri, IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका ९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. क्रिकेटच्या मैदानात हे दोन संघ भिडणार म्हटल्यावर सारं काही ब्लॉकबस्टर असणार हे नक्की. गेल्या वेळी जेव्हा दोन्ही संघ आमनेसामने आले, तेव्हा टीम इंडियाने ऐतिहासिक विजयाची नोंद केली. या मालिकेतून एक किस्सा समोर आला आहे.  ऑस्ट्रेलियात हा प्रकार घडला होता. तेथे एक भारतीय क्रिकेटपटू माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशी खोटं बोलला होता.

टीम इंडियाचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर.के. श्रीधर यांनी त्यांच्या पुस्तकात एक किस्सा सांगितला आहे. आर. श्रीधर लिहिले आहे की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या २-१ मालिकेतील विजयातील गाबा लढत सर्वांनाच आठवत आहे, परंतु हनुमा विहारी आणि रविचंद्रन अश्विन यांच्यातील भागीदारीने तिसऱ्या  कसोटीत आश्चर्यकारक कामगिरी केली ती सर्वाधिक लक्षात राहिली आणि त्यामुळेच सामना अनिर्णित राहिला.

शार्दुल ठाकूरनेरवी शास्त्रींचे ऐकलंच नाही अन् मग...

खरे तर असे झाले की टीम इंडियाला सामना वाचवायचा होता आणि हे दोन फलंदाज उरले होते. तेव्हा टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्या सामन्यात खेळत नसलेल्या शार्दुल ठाकूरला बोलवले. त्यांनी शार्दुलला सांगितले की मैदानात जाऊन निरोप दे की, हनुमा विहारी वेगवान गोलंदाजांना खेळेल आणि अश्विन फिरकी गोलंदाजी खेळेल व एकही धाव घेणार नाही. शार्दुल ठाकूरने इथे रवी शास्त्रींना ठीक म्हटले, पण जेव्हा तो विहारी-अश्विनला पोहोचला तेव्हा तो म्हणाला की आतून अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत, पण तुम्ही दोघेही चांगले खेळत आहात. तुम्ही फक्त तुमच्या मनाप्रमाणे खेळत राहा. त्यावेळी शार्दुलने असा निरोप दिल्याचा फलंदाजांवर योग्य परिणाम झाला, असे श्रीधरने आपल्या पुस्तकात म्हटले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटच्या मालिकेत टीम इंडियाने २-१ ने विजय मिळवला होता. पहिल्या सामन्यात भारत ३६ धावांवर ऑलआऊट झाला होता, त्यानंतर टीम इंडियाने पुनरागमन करत मालिका जिंकली.

Web Title: IND vs AUS Shardul Thakur did not listen to Ravi Shastri and said something else to R Ashwin Hanuma Vihari in Gabba test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.