सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : चौथ्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या दोन्ही दिवसांवर वर्चस्व गाजवले. भारताने दुसऱ्या दिवशी 622 धावांचा डोंगर उभारला असून त्यांनी विजयासाठी भक्कम पाया रचला आहे. पण दुसरीकडे ऑस्ट्रेलियाची सुमार कामगिरी ही संघातील भांडणामुळे होत असल्याचे समोर आले आहे.
चौथ्या सामन्याच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन आणि वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क यांच्यामध्ये मैदानात भांडण झाल्याचे पाहायला मिळाले. या भांडणाचा परीणाम ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीवर झाल्याचे म्हटले जात आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघात भांडण झाले होते, या गोष्टी गोलंदाजी प्रशिक्षक डेव्हिड सेकर यांनीही दुजोरा दिला आहे.
याबाबत सेकर म्हणाले की, " चौथ्या सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंमध्ये बेबनाव झाल्याचे पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची वेगळी रणनीती होती, पण कर्णधार पेनने मात्र या रणनीतीची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे पेन आणि स्टार्क यांच्यामध्ये मैदानात काही गैरसमज झाले. या साऱ्या गोष्टीमुळे आम्ही निराश आहोत. सामन्याच्या पहिल्या दिवशी आमच्याकडून चांगला खेळ झाला नाही."