IND vs AUS T20 2022 Live : भारत-ऑस्ट्रेलिया दुसरा सामना होणार की नाही? जाणून घ्या स्टेडियममधून Live अपडेट्स 

IND vs AUS T20 2022 Live Match Scorecard : ऑस्ट्रेलियाने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात भारतीय संघावर विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 05:50 PM2022-09-23T17:50:50+5:302022-09-23T17:51:13+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS T20 2022 Live Match : India-Australia second match happen or not? Get live updates from the stadium | IND vs AUS T20 2022 Live : भारत-ऑस्ट्रेलिया दुसरा सामना होणार की नाही? जाणून घ्या स्टेडियममधून Live अपडेट्स 

IND vs AUS T20 2022 Live Match Scorecard

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs AUS T20 2022 Live Match Scorecard : ऑस्ट्रेलियाने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात भारतीय संघावर विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मालिकेतील दुसरा सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आज होणार आहे आणि हा टीम इंडियासाठी आव्हान कायम राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. भारतीय संघ नागपूरमध्ये विजय मिळवून मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवेल, असा विश्वास चाहत्यांना आहे. पण, या सामन्यावर पावसाची वक्रदृष्टी पडण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय..


मोहाली येथे झालेल्या पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्या, लोकेश राहुल व सूर्यकुमार यादव यांनी फलंदाजीत कमाल दाखवताना भारताला २०८ धावांचा टप्पा गाठून दिला. पण, गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे आणि लोकेश व अक्षर पटेल यांनी झेल सोडल्यामुळे भारताच्या हातून हा सामना निसटला. अक्षर पटेल ( ३-१७) वगळल्यास अन्य गोलंदाज अपयशी ठरले. त्यामुळे आजच्या सामन्यात जसप्रीत बुमराहचे पुनरागमन पक्के समजले जात आहे. त्याच्यासाठी भुवनेश्वर कुमार किंवा उमेश यादव यांना बाहेर बसवले जाऊ शकते. 

पण, या सामन्यात पाऊस व्यत्यय निर्माण करण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. हवमान खात्याच्या माहितीनुसार नागपूरात शुक्रवारी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला होता. पण, Lokmat.comच्या प्रतिनिधिने थेट स्टेडियममधून अपडेट्स दिले आहेत. मैदानावर चांगलं ऊन पडलेलं दिसतंय आणि पावसानेही दडी मारली आहे. काल पाऊस पडल्यामुळे ग्राऊंड्समन खेळपट्टी सुकवत आहेत.

 

भारताचा आजच्या सामन्यासाठी असा असू शकतो संघ- रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल

 

Web Title: IND vs AUS T20 2022 Live Match : India-Australia second match happen or not? Get live updates from the stadium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.