IND vs AUS T20 2022 Live : Ro'HIT' मॅन! रोहित शर्माकडून ऑस्ट्रेलियाची धुलाई; Dk ने दोन चेंडूत मॅच फिरवली, भारताने मालिकेत बरोबरी मिळवली

भारताचा कर्णधार रोहित शर्माचे ( Rohit Sharma) वादळ नागपूरमध्ये घोंगावले. पण, अ‍ॅडम झम्पाने ३ महत्त्वाच्या विकेट्स घेत ऑसींना कमबॅक करून दिले. पण, रोहितने विजय मिळवून दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 11:02 PM2022-09-23T23:02:08+5:302022-09-23T23:06:24+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS T20 2022 Live Match : India beat Australia by 6 wickets, level the series 1-1, Rohit Sharma score 46 runs in 20 balls | IND vs AUS T20 2022 Live : Ro'HIT' मॅन! रोहित शर्माकडून ऑस्ट्रेलियाची धुलाई; Dk ने दोन चेंडूत मॅच फिरवली, भारताने मालिकेत बरोबरी मिळवली

IND vs AUS T20 2022 Live : Ro'HIT' मॅन! रोहित शर्माकडून ऑस्ट्रेलियाची धुलाई; Dk ने दोन चेंडूत मॅच फिरवली, भारताने मालिकेत बरोबरी मिळवली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs AUS T20 2022 Live Match Scorecard : ऑसी कर्णधार अॅरोन फिंच व मॅथ्यू वेड यांनी दमदार खेळ करताना भारतासमोर तगडे लक्ष्य उभे केले. अक्षर पटेल पुन्हा एकदा उपयुक्त गोलंदाज ठरला, परंतु इतरांनी निराश केले. भारताचा कर्णधार रोहित शर्माचे ( Rohit Sharma) वादळ नागपूरमध्ये घोंगावले. पण, अ‍ॅडम झम्पाने ३ महत्त्वाच्या विकेट्स घेत ऑसींना कमबॅक करून दिले. अखेरच्या तीन षटकांत रोहितने पुन्हा वादळ आणले आणि भारताला विजय मिळवून दिले. या विजयासह भारताने मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. 

अक्षर पटेलने टाकलेल्या दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विराट कोहलीकडून कॅमेरून ग्रीनचा सीमारेषेवर झेल सुटला. पण, पुढच्याच चेंडूवर विराट व अक्षरने त्याला रन आऊट करून ऑसींना पहिला धक्का दिला. अक्षरने अखेरच्या चेंडूवर ग्लेन मॅक्सवेला ( ०) आणि पुढच्या षटकात टीम डेव्हिडला ( २) बाद केले. त्याने २ षटकांत १३ धावा देताना २ विकेट्स घेतल्या. पाचव्या षटकात जसप्रीत बुमराह गोलंदाजीला आला अन् स्टेडियममध्ये नावाचा गजर घुमला. बुमराहने त्याच्या षटकाच्या अखरेच्या चेंडूवर भन्नाट यॉर्कर टाकून फिंचचा त्रिफळा उडवला. ऑसी कर्णधार १५ चेंडूंत ३१ धावा करून माघारी परतला. 


फिंचने बुमराहच्या यॉर्करचे कौतुक करताना टाळी वाजवली. बुमराहने २ षटकांत २२ धावा देत १ विकेट घेतली. हर्षल पटेलने टाकलेल्या आठव्या षटकात मॅथ्यू वेडने तीन षटकार खेचले. वेडने २० चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ४३ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने ५ बाद ९० धावा केल्या. हर्षलने २ षटकांत ३२ धावा दिल्या. 

जोश हेझलवूडच्या पहिल्याच षटकात रोहितने षटकार खेचून आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सर्वाधिक १७३* Six चा विक्रम नावावर केला. न्यूझीलंडचा मार्टिन गुप्तील १७२ षटकारांसह दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे. रोहितने सलग दोन षटकार खेचले. लोकेश राहुलनेही एक षटकार खेचून पहिल्याच षटकात २० धावा जोडल्या. पॅट कमिन्सलाही रोहितने षटकार खेचला. अ‍ॅडम झम्पालाही रोहितने षटकार खेचला, परंतु त्याने लोकेशची ( १०) विकेट घेऊन त्याची भरपाई केली. भारताने ४ षटकांत ५१ धावा फलकावर चढवल्या. झम्पाने त्याच्या पुढच्या षटकात विराटचा ( ११) त्रिफळा उडवून भारताला दुसरा धक्का दिला. सूर्यकुमार यादव स्वीप मारण्याच्या प्रयत्नात गोल्डन डकवर LBW झाला. झम्पाने २ षटकांत १६ धावांत ३ विकेट्स घेतल्या.

भारताला १८ चेंडूत ३३ धावा करायच्या होत्या आणि हार्दिक पांड्या-रोहित ही जोडी खेळपट्टीवर होती. रोहितने सामन्यात पहिलेच षटक टाकणाऱ्या सीन अ‍ॅबोटला टार्गेट बनवले. त्या षटकात ११ धावा आल्याने भारताला १२ चेंडूंत आता २२ धावा करायच्या होत्या आणि ते सहज शक्य दिसत होते. हार्दिक ( ९) चांगली साथ देतोय असे दिसत असताना कमिन्सने त्याला स्लो चेंडूवर फटका मारण्यास भाग पाडले. फिंचने सहज झेल टिपला. रोहित असल्याने भारतीयांना विजयाचा विश्वास होता. भारताला ६ चेंडूंत ९ धावा हव्या होत्या. दिनेश कार्तिकने पहिलाच चेंडू सिक्स मारून ५ चेंडू ३ धावा असा सामना झुकवला. त्याने चौकार खेचून भारताचा विजय पक्का केला. रोहितने 20 चेंडूंत नाबाद 46 धावा करताना 4 चौकार व 4 षटकार खेचले. कार्तिकने 2 चेंडूंत 1 चौकार व 1 षटकार खेचून नाबाद 10 धावा केल्या. भारताने 6 विकेट्सने हा सामना जिंकला.

Web Title: IND vs AUS T20 2022 Live Match : India beat Australia by 6 wickets, level the series 1-1, Rohit Sharma score 46 runs in 20 balls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.