IND vs AUS T20 2022 Live Match Scorecard : मागील तीन दिवस नागपूरात पाऊस पडल्याने विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमची खेळपट्टी ओलीच होती. आज दिवसभर पाऊस पडला नसला तरी मैदान सुकवण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागली होती. त्यामुळेच ६.३०, ७ आणि ८ वाजता अम्पायर्स व सामनाधिकाऱ्यांकडून खेळपट्टीची पाहणी केली गेली. भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिका वाचवण्यासाठी आजचा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आज दिवसभर पाऊस नसूनही सामना वेळेत सुरू होत नसल्याने उपस्थित प्रेक्षकांचा संयम सुटताना दिसत होता. आता चौथ्यांदा पाहणी होईल आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IND vs AUS T20 2022 Live : अम्पायर्सकडून चौथ्यांदा होणार मैदानाची पाहणी; कट ऑफ टाईम ठरला, ५-५ षटकांचा होणार सामना?
IND vs AUS T20 2022 Live : अम्पायर्सकडून चौथ्यांदा होणार मैदानाची पाहणी; कट ऑफ टाईम ठरला, ५-५ षटकांचा होणार सामना?
आज दिवसभर पाऊस पडला नसला तरी मैदान सुकवण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागली होती. त्यामुळेच ६.३०, ७ आणि ८ वाजता अम्पायर्स व सामनाधिकाऱ्यांकडून खेळपट्टीची पाहणी केली गेली.
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 8:13 PM