Join us  

IND vs AUS T20 2022 Live : भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याची वेळ बदलली; BCCI ने महत्त्वाची माहिती दिली, रोहित-राहुलची चिंता वाढली

IND vs AUS T20 2022 Live Match Scorecard : भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिका वाचवण्यासाठी आजचा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 6:33 PM

Open in App

IND vs AUS T20 2022 Live Match Scorecard : भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिका वाचवण्यासाठी आजचा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात  विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आज दुसरा सामना होतोय. पावसामुळे हा सामना रद्द केला जाऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण, पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र शुक्रवारी पाहायला मिळालं. पण, मागील तीन दिवस पावसाने  दमदार बॅटिंग केली आणि त्यामुळे सामना सुरू होण्यास विलंब होतोय...

मोहाली येथे झालेल्या पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्या, लोकेश राहुल व सूर्यकुमार यादव यांनी फलंदाजीत कमाल दाखवताना भारताला २०८ धावांचा टप्पा गाठून दिला. पण, गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे आणि लोकेश व अक्षर पटेल यांनी झेल सोडल्यामुळे भारताच्या हातून हा सामना निसटला. अक्षर पटेल ( ३-१७) वगळल्यास अन्य गोलंदाज अपयशी ठरले. त्यामुळे आजच्या सामन्यात जसप्रीत बुमराहचे पुनरागमन निश्चित मानले जात आहे. त्यासाठी लोकल बॉय उमेश यादवला  बाहेर बसवले जाते की भुवनेश्वर कुमारला याची उत्सुकता आहे.

आजही पावसाची शक्यता वर्तवली जात होती, परंतु सुदैवाने पाऊस पडला नाही. परंतु, मागील तीन दिवस येथे पाऊस सतत सुरू असल्याने खेळपट्टी अजूनही हवी तशी सुकलेली नाही. सायंकाळी ६.३० वाजता नाणेफेक होणार होती, परंतु अम्पायर्सनी खेळपट्टीची पाहणी केली आणि आता ७ वाजता पुन्हा पाहणी केली जाईल. आणखी उशीर झाल्यास षटकं कमी केली जाऊ शकतात. 

रोहित शर्माने इमर्जन्सी मिटींग बोलावली, गोलंदाजांची शाळा भरवली१३ ऑक्टोबर पासून ट्वेंटी-२० वर्ल्ड कपला सुरूवात होतेय आणि २३ तारखेला भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान आहे. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारताला अधिकचा सराव मिळावा यासाठी ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्धच्या मालिकेचे आयोजन केले गेले. पण, पहिल्या सामन्यात २०८ धावा करूनही भारताला हार मानावी लागली. या पराभवानंतर रोहित, राहुल व गोलंदाज प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांनी महत्त्वाची बैठक बोलावली. यावेळी मानसिक कंडिशनिंग प्रशिक्षक पॅडी अप्टनही उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर अप्टन यांनी भारतीय गोलंदाजांसह वैयक्तिक सेशन घेतले.  

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाबीसीसीआयनागपूर
Open in App