IND vs AUS T20 2022 Live Match Scorecard : मागील तीन दिवस नागपूरातपाऊस पडल्याने आजच्या सामन्याला विलंब झाला. ग्राऊंड्समन खेळपट्टी सुकवण्यासाठी प्रचंड मेहतन घेताना दिसले. भारताला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी आजचा सामना जिंकणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थिती हा सामना व्हावा यासाठी विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमचे ग्राऊंड्समन काम करताना दिसले. खेळपट्टी ओली असल्यामुळे अम्पायर्सनी ६.३०ला होणारा टॉस पुढे ढकलला. ७ वाजता अम्पायर्स पुन्हा मैदानावर आले, परंतु तेव्हाही ते निर्णय घेऊ शकले नाही. दरम्यान, रोहित शर्मा नाराज दिसला.
भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिका वाचवण्यासाठी आजचा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आज दुसरा सामना होतोय. पावसामुळे हा सामना रद्द केला जाऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण, पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र शुक्रवारी पाहायला मिळालं. पण, मागील तीन दिवस पावसाने दमदार बॅटिंग केली आणि त्यामुळे सामना सुरू होण्यास विलंब होतोय. ७ वाजता पुन्हा खेळपट्टीची पाहणी झाली. आज दिवसभर पाऊस नसूनही सामना वेळेत सुरू होत नसल्याने उपस्थित प्रेक्षकांचा संयम सुटताना दिसत होता.
आजही पावसाची शक्यता वर्तवली जात होती, परंतु सुदैवाने पाऊस पडला नाही. परंतु, मागील तीन दिवस येथे पाऊस सतत सुरू असल्याने खेळपट्टी अजूनही हवी तशी सुकलेली नाही. सायंकाळी ६.३० वाजता नाणेफेक होणार होती, परंतु अम्पायर्सनी खेळपट्टीची पाहणी केली आणि आता ७ वाजता पुन्हा पाहणी झाली. तेव्हाही अम्पायर्स खेळपट्टीबाबत समाधानी दिसले नाही आणि त्यांनी दोन्ही कर्णधारांना बोलावून परिस्थितीबाबत सांगितले. आता ८ वाजता पुन्हा पाहणी केली जाणार असल्याने षटकांची संख्या कमी होईल हे निश्चित आहे. रोहित मात्र नाराज दिसला.
Web Title: IND vs AUS T20 2022 Live Match : UPDATE: The outfield is still slightly wet so there will be another pitch inspection at 8pm local time. Overs will be lost now
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.