ब्रिस्बेन, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा कसोटी सामना पाहण्यासाठी जाणार असल्याचे समजत आहे. हा सामना उद्या शुक्रवारी मेलबर्न येथे खेळवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियातील सिडनी मॉर्निंग हेराल्ड या वर्तमानपत्राने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे.
सिडनी मॉर्निंग हेराल्डने आपल्या बातमीमध्ये म्हटले आहे की, " भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे चार दिवसांच्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर येणार आहेत. या सामन्यापासून त्यांच्या या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. "
पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. धवनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात 42 चेंडूंत 10 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 76 धावांची खेळी साकारली होती. पण ही खेळी साकारल्यानंतरही धवनला भारताला विजय मिळवून देण्यात अपयश आले होते. हा सामना जर भारताने गमावला तर त्यांना ही मालिका गमवावी लागणार आहे.