ठळक मुद्देधवनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात 76 धावांची खेळी साकारली होती. या खेळीत धवनने 10 चौकार आणि दोन षटकार लगावले होते.ही खेळी साकारल्यानंतरही धवनला भारताला विजय मिळवून देण्यात अपयश आले होते.
ब्रिस्बेन, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. पण या सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा केल्या त्या सलामीवीर शिखर धवनने. या सामन्यात दमदार फलंदाजी करत धवनने एक विक्रम बनवला असून त्याने भारताचा कर्णधार विराट कोहलीलाही पिछाडीवर टाकले आहे.
धवनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात 42 चेंडूंत 10 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 76 धावांची खेळी साकारली होती. पण ही खेळी साकारल्यानंतरही धवनला भारताला विजय मिळवून देण्यात अपयश आले होते.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात विक्रम करत धवनने कोहलीलाही मागे टाकले आहे. धवनने या कॅलेंडर वर्षात 646 धावा केल्या आहेत. हा विक्रम यापूर्वी कोहलीच्या नावावर होता कोहलीने 2016 साली 641 धावा केल्या होत्या.
Web Title: IND vs AUS T20: shikhar Dhawan made it to be record that virat Kohli too has left behind
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.