ब्रिस्बेन, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघ दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यासाठी मेलबर्नमध्ये दाखल झाला आहे. हा सामना जर भारताने गमावला तर त्यांना ही मालिका गमवावी लागणार आहे. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा कसोटी सामना पाहण्यासाठी जाणार असल्याचे समजत आहे. त्यामुळे या सामन्याला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे.
पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. शिखर धवनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात 42 चेंडूंत 10 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 76 धावांची खेळी साकारली होती. पण ही खेळी साकारल्यानंतरही धवनला भारताला विजय मिळवून देण्यात अपयश आले होते. हा सामना जर भारताने गमावला तर त्यांना ही मालिका गमवावी लागणार आहे.