India vs Australia : भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका २-१ अशी जिंकली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची तयारी व्हावी यादृष्टीने भारतासाठी ही मालिका महत्त्वाची होती. पहिला सामना गमावल्यानंतर रोहित शर्मा अँड टीमवर टीका सुरू झाली. त्यात नागपूर कसोटी पावसामुळे होते की नाही अशी शंका होती, परंतु ८-८ षटकांच्या त्या लढतीत भारताने बाजी मारून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. हैदराबादमध्ये विराट कोहली व सूर्यकुमार यादवचे वादळ घोंगावले आणि भारताने मालिका जिंकली. भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दिनेश कार्तिक/रिषभ पंत यांच्यात टॉस सुरूच होता. त्यात Rishabh Pant ला नागपूरमध्ये संधी मिळाली, परंतु त्याला फलंदाजीच मिळाली नाही. त्यानंतर हैदराबाद येथे विजयाचं सेलिब्रेशन करताना रिषभ एकटा पडल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
हार्दिक पांड्याला तातडीनं NCA मध्ये व्हाव लागलं दाखल, T20 World Cup पूर्वी टीम इंडियाला टेंशन?
दिनेश कार्तिकने ज्याप्रकारे मेहनत घेऊन भारतीय संघात पुनरागमन केले. २००७चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप ते २०२२चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे भारतीय संघात कार्तिक व रोहित शर्मा हे दोनच खेळाडू आहेत. त्याचा फॉर्म लक्षात घेता रोहितनेही त्यालाच प्लेइंग इलेव्हनमध्ये अधिक संधी देण्याचं ठरवलेलं दिसतंय. नागपूर सामन्यात दिनेशने दोन चेंडूंत सामना जिंकून दिल्यावर रोहितने त्याला घट्ट मिठी मारली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहितने त्याला तीनही सामन्यात खेळवले. अशात रिषभचे चाहते नाराज झालेले पाहायला मिळत आहेत. रिषभचा फॉर्म त्याला सध्या साथही देताना दिसत नाही.
हैदराबाद सामना जिंकल्यानंतर भारतीय खेळाडू विजयाचं सेलिब्रेशन करत असताना रिषभ आपल्याकडे कोणीतरी पाहिल या अपेक्षेने पाहत होता, परंतु त्याच्याकडे कुणी लक्षच दिले नाही. रिषभच्या चाहत्यांकडून हा व्हिडीओ व्हायरल केला जात आहे.