Join us

Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त

4 Indians Players Injured, IND vs AUS 1st Test: पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी २२ नोव्हेंबरपासून पर्थ येथे होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 12:24 IST

Open in App

4 Indians Players Injured, IND vs AUS 1st Test: भारतीय कसोटी संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. २२ नोव्हेंबरपासून भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध ५ सामन्यांची बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका खेळणार आहे. मालिकेचा पहिला सामना २२ नोव्हेंबरपासून पर्थ येथे होणार आहे. पण त्याआधीच भारतीय संघावर दुखापतींचे संकट ओढवले असून ४ महत्त्वाचे खेळाडू जखमी असल्याचे वृत्त आहे. पर्थ कसोटीपूर्वी भारतीय खेळाडू वाका स्टेडियममध्ये जोरदार सराव करत आहेत. भारत आणि भारत-अ संघादरम्यान तीन दिवसीय सराव सामनाही खेळवला गेला आहे. या सरावात चार खेळाडूंना काही अंशी दुखापत झाल्याने संघाचे टेन्शन वाढले आहे.

गिल वर वैद्यकीय टीमचे लक्ष- सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शुभमन गिलला दुखापत झाली. दुसऱ्या स्लिपमध्ये झेल घेताना गिल जखमी झाला. गिलच्या बोटाला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो पहिल्या कसोटी सामन्यात खेळेल की नाही याबाबत साशंकता आहे. गिलबाबत लवकरच अधिकृत निर्णय घेतला जाईल. एका सूत्राने TOI ला सांगितले की, शुबमन गिल दुखापतग्रस्त आहे, पण सध्या त्याच्याबद्दल बोलणे खूपत आतातायीपणाचे ठरेल, वैद्यकीय पथक त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून आहे.

केएल राहुल जखमी - या सराव सामन्यात केएल राहुललाही दुखापत झाली. वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाचा एक चेंडू त्याच्या उजव्या कोपराला लागला. यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. राहुलच्या दुखापतीचे गांभीर्य अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, पहिल्या कसोटीसाठी तो तंदुरुस्त होईल, अशी अपेक्षा आहे.

सरफराजदेखील जायबंदी- सरफराज खानही जखमी झाला आहे. सरावादरम्यान सरफराजला कोपराला दुखापत झाली. एका व्हिडिओमध्ये सरफराज कोपर धरून बाहेर जाताना दिसला. न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत सरफराजने एका सामन्यात १५० धावांची खेळी केली होती. त्यामुळे त्याची दुखापत हा संघासाठी मोठा धक्का ठरू शकतो.

विराट कोहलीही जखमी- विराट कोहलीबाबतही दुखापतीची एक बातमी समोर आली आहे. सराव सामन्यापूर्वी कोहलीला काही तरी दुखापत झाली होती, त्यामुळे त्याला स्कॅनसाठी नेण्यात आले होते, मात्र चांगली गोष्ट म्हणजे कोहली सराव सामना खेळला आणि आता तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीसर्फराज खानशुभमन गिललोकेश राहुल