Join us  

IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी२० मालिकेसाठीही संघ जाहीर करण्यात आला आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 10:26 PM

Open in App

Team India Squad Announced, IND vs AUS Test and IND vs SA T20: न्यूझीलंड विरूद्ध दुसरी कसोटी सुरु असतानाच आगामी काळातील दोन मालिकांसाठी भारतीय संघाची आज बीसीसीआयने घोषणा केली. भारतीय संघ ८ ते १५ नोव्हेंबर दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी२० मालिका खेळणार आहे. तर २२ नोव्हेंबर ते ८ जानेवारी या दरम्यान ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. अपेक्षेप्रमाणे टी२० संघाचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवला आणि कसोटी संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे देण्यात आले आहे. बहुप्रतिक्षित ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात बॅकअप सलामीवीर म्हणून अभिमन्यू इश्वरनला संधी देण्यात आली आहे. कुलदीप यादवला संघाबाहेर करण्यात आले असून प्रसिध कृष्णाला संघात अचानक संधी मिळाली आहे. नीतीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा या दोघांना कसोटीत पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. कुलदीप सोबतच अक्षर पटेललादेखील संघातून वगळण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारताचा कसोटी संघ- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश रेड्डी, वॉशिंगटन सुंदर

दक्षिण आफ्रिके विरूद्ध टी२० मालिकेआधी संघ जाहीर (Team India Squad Announced, IND vs SA T20)

BCCI ने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी टी२० मालिकेसाठी संघाचीही घोषणा केली. मयंक यादव आणि शिवम दुबे यांची संघात निवड केलेली नाही. दुखापतीमुळे त्यांना वगळण्यात आले आहे. रियान परागदेखील उजव्या खांद्याच्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. संजू सॅमसनचे संघातील स्थान कायम आहे. तसेच अभिषेक शर्मालाही संधी देण्यात आली आहे. नितीश कुमार रेड्डी सोबतच रमणदीप सिंग, विजय कुमार आणि यश दयाल यांना संधी मिळाली आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय टी२० संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजय कुमार, अवेश खान, यश दयाल

ननन

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाटी-20 क्रिकेट