ठळक मुद्देभारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री कधी काय बोलतील, याचा नेम नसतो. कधी ते समोरच्यावर प्रहार करतात, तर कधी आपल्या खेळाडूंची बाजू घेतात.
अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री कधी काय बोलतील, याचा नेम नसतो. कधी ते समोरच्यावर प्रहार करतात, तर कधी आपल्या खेळाडूंची बाजू घेतात. त्यामुळे आमचा खेळाडू चालायला लागला आहे, असे विधान केल्यावर शास्त्री नेमके कशाबद्दल बोलत आहेत, याचा अंदाज लागत नाही.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला 6 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ सध्याच्या घडीला सराव करत आहेत. 2014 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता.
पहिल्या सामन्यापूर्वी शास्त्री म्हणाले की, " आमचा चांगला सराव झाला आहे. सरावादरम्यान पृथ्वी शॉ याला दुखापत झाली होती. त्याच्या पायाला दुखापत झाली होती आणि ती गंभीर स्वरुपाची होती. त्याला उभेही राहता येत नव्हते. पण आता त्याच्यी तब्येत सुधारत आहे. आता तो चालायलाही लागला आहे."
Web Title: IND vs AUS Test: ... and Ravi Shastri said, "Our player has started walking
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.