Join us  

IPL नव्हे देश आधी! दिल्ली कसोटीत विराट कोहलीने कृतीतून दाखवून दिलं 'देश प्रेम', Video

India vs Australia Delhi Test : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्सने विजय मिळवताना बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्वतःकडे कायम राखली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 10:38 AM

Open in App

India vs Australia Delhi Test : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्सने विजय मिळवताना बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्वतःकडे कायम राखली. ऑस्ट्रेलियाचा दुसारा डाव ११३ धावांवर गुंडाळल्यानंतर भारताने ४ विकेट्सच्या मोबदल्यात हे लक्ष्य पार केले. या सामन्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विराट कोहलीच्या या कृतीने पुन्हा एकदा साऱ्यांची मनं जिंकली गेली आहेत.  

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाच्या २६३ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने २६२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव ११३ धावांत गुंडाळण्यात भारताला यश आले. जडेजाने ४२ धावांत ७ विकेट्स घेतल्या. अश्विनने ५९ धावांत ३ विकेट्स मिळवले.  ११५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहितने २० चेंडूंत ३१ धावा केल्या. विराटने २० धावा केल्या. श्रेयस अय्यर १२ धावांवर बाद झाला. पुजारा ३१ आणि भरत २३ धावांवर नाबाद राहिले आणि भारताने ६ विकेट्सने हा सामना जिंकला.  

या कसोटी दरम्यान दिल्लीकर प्रेक्षक विराटच्या समर्थनात RCB, RCB असा जयघोष करत होते, परंतु विराटने त्याच्या जर्सीवरील अशोकचक्राकडे हात दाखवून भारताच्या नावाने जयघोष करा असे त्यांना सांगताना दिसला. आयपीएलमध्ये विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळतो, म्हणून RCB, RCB असा जयघोष सुरू होता. पण विराटच्या कृतीने सर्वांची मनं जिंकली.  

२०१७नंतर विराट प्रथमच दिल्लीत कसोटी खेळला. या सामन्यात त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांत ( Innings)  २५ हजार धावा पूर्ण करणाऱ्या फलंदाजाचा विक्रम केला. त्याने महान फलंदाज सचिन तेंडुलकचा विक्रम मोडला. विराटने ५४९ डावांत हा टप्पा ओलांडला. सचिनला ५७७ डाव खेळावे लागले होते. शिवाय वयाच्या ३४ पर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत विराट दुसऱ्या स्थानावर पोहोचला. त्याने रिकी पाँटिंगचा २४१९३ धावांचा विक्रम मोडला.    

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App