ठळक मुद्देऑस्ट्रेलियाच्या संघात जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्कसारखे अव्वल दर्जाचे वेगवान गोलंदाज आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवर चेंडू जास्त उसळतो.त्यामुळे भारतीय फलंदाजांना ही कसोटी मालिका नक्कीच सोपी नसेल.
सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संधा खेळाडूंपेक्षा माजी खेळाडूंकडूनच जास्त त्रास होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता तर ऑस्ट्रेलियाचे माजी महान क्रिकेटपटू इयान चॅपेल यांनी तर विराटसेनेला वॉर्निंग दिली आहे.
चॅपेल यांनी सांगितले की, " भारताच्या संघाने ट्वेन्टी-20 सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली. पण कसोटी मालिकेत त्यांना ऑस्ट्रेलियाकडून त्यांनी कडवी झुंज मिळू शकते. डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्हन स्मिथ हे दोघेही संघात नाहीत. पण तरीही ऑस्ट्रेलियाचा संघ चांगलाच तुल्यबळ आहे."
भारताने ट्वेंटी-20 मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाला 1-1 अशा बरोबरीत रोखले. ट्वेंटी-20 मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यांतही पावसाने व्यत्यय आणला. दुसरा सामना तर पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे भारताची सलग सात ट्वेंटी-20 मालिका जिंकण्याच्या घोडदौडीला ब्रेक लागला. कसोटी मालिकेत भारतीय संघ विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि स्टीव्हन स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांच्या अनुपस्थितीत भारताला ही मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे, असे बऱ्याच जणांनी म्हटले आहे.
चॅपेल पुढे म्हणाले की, " ऑस्ट्रेलियाच्या संघात जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्कसारखे अव्वल दर्जाचे वेगवान गोलंदाज आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवर चेंडू जास्त उसळतो. त्यामुळे भारतीय फलंदाजांना ही कसोटी मालिका नक्कीच सोपी नसेल. जर ही मालिका आम्ही जिंकू, असे भारतीय संघाला वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज असेल. "
भारतीय संघाचा सराव सामना सुरु झाला असला, तरी पावसामुळे खेळ झालेला नाही. भारतीय प्रमाणवेळेनुसार क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्धचा सराव सामना पहाटे 5.30 वाजता सुरू होणार होता, परंतु पावसाच्या हजेरीने सामना सुरुच झाला नाही. सकाळपासून सुरु असलेला पाऊस विश्रांती घेण्याच्या मुडमध्ये नव्हता. त्यामुळे खेळाडूंना ड्रेसिंग रुमबाहेर पडताच येत नव्हते. त्यामुळे कोहली सहकाऱ्यांना जिममध्ये व्यायाम करण्यासाठी घेऊन गेला. त्यांनी बराच काळ जिममध्ये घालवला.
Web Title: IND vs AUS Test: former australian captain ian chappell warns team india for test series said dont take it easier
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.