Join us  

Ind vs Aus Test: भारतीयांपुढे ऑस्ट्रेलियात कामगिरी उंचावण्याचे आव्हान

बॉर्डर-गावसकर चषक विक्रम ; तेंडुलकर, पाँटिंग यांनी गाजवली मालिका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 4:32 AM

Open in App

- रोहित नाईकमुंबई : यंदाच्या वर्षातील आयपीएलच्या यशस्वी आयोजनानंतर आता क्रिकेटविश्व सज्ज झाले आहे ते ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील हायव्होल्टेज कसोटी मालिकेसाठी. या मालिकेआधी झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत यजमान  ऑस्ट्रेलियाने २-१ अशी, तर टी-२० मालिकेत भारताने २-१ अशी बाजी मारत हिशेब चुकता केला. त्यामुळेच आता चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत भारतीय संघ कायम पिछाडीवर राहिला आहे. मात्र ऑस्ट्रेलियात झालेली याआधीची मालिका जिंकून ऐतिहासिक कामगिरी केलेला भारतीय संघ किती धोकादायक आहे, याची जाणीव यजमानांनाही आहे. त्यामुळेच ही मालिका अत्यंत अटीतटीची होणार यात शंका नाही. यानिमित्तानेच ऑस्ट्रेलियात झालेल्या भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यातील विक्रमांवर टाकलेली एक नजर... कामगिरी (ऑस्ट्रेलियातील सामने)सामने     ४८ भारत    ७ विजयीऑस्ट्रेलिया    २९ विजयीअनिर्णित    १२ सर्वाधिक सांघिक धावा भारत : ७ बाद ७०५ धावा (२००३-०४)ऑस्ट्रेलिया : ६७४ धावा (१९४८) ऑस्ट्रेलिया : ४ बाद ६५९ धावा (२०१२) सर्वात कमी धावसंख्या भारत     ५८ धावा (ब्रिस्बेन, १९४७) भारत     ६७ धावा (मेलबर्न, १९४८) ऑस्ट्रेलिया     ८३ धावा (मेलबर्न, १९८१) सर्वाधिक धावांचा पाठलाग ऑस्ट्रेलिया     ३४२ धावा (पर्थ, १९७७) भारत     २३३ धावा (अ‍ॅडलेड, २००३) सर्वाधिक धावा (वैयक्तिक) १. रिकी पाँटिंग    १८९३ धावा.२. सचिन तेंडुलकर     १८०९ धावा.३. विराट कोहली    १२७४ धावा.मालिकेत सर्वाधिक धावा१. स्टीव्ह स्मिथ : ७६९ धावा (२०१४-१५)२. सर डॉन ब्रॅडमन : ७१५ धावा (१९४७) ३. रिकी पाँटिंग : ७०६ धावा (२—३-०४).४. विराट कोहली : ६९२ धावा (२०१४). भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेला १९४७-४८ सालापासून सुरुवात झाली. कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा पल्ला         पार करणारे पहिले दोन फलंदाज म्हणजे सुनील गावसकर आणि अ‍ॅलन बॉर्डर. या दोन्ही दिग्गज खेळाडूंचे क्रिकेटविश्वातील योगदान लक्षात घेऊनच ऑस्ट्रेलिया-भारत दरम्यानच्या कसोटी मालिकेला १९९६-९७ पासून बॉर्डर-गावसकर चषक असे नाव देण्यात आले. तेव्हापासून या चषकावर भारताने ८ वेळा कब्जा केला, तर ऑस्ट्रेलियाने ५ वेळा बाजी मारली. तसेच, केवळ एकदाच ही मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.सर्वोत्तम वैयक्तिक खेळी १. मायकल क्लार्क : ३२९ धावा (सिडनी, २०१२-१३)२. रिकी पाँटिंग : २५७ धावा (मेलबर्न, २००३-०४)३. सचिन तेंडुलकर : २४१ धावा (सिडनी, २००३-०४)४. रिकी पाँटिंग : २४२ धावा (अ‍ॅडलेड, २००३-०४).सर्वाधिक शतके रिकी पाँटिंग : ७ सचिन तेंडुलकर : ६ विराट कोहली : ६ सर्वाधिक बळी कपिल देव : ५१नॅथन लियॉन : ५१ अनिल कुंबळे : ४९५ किंवा अधिक बळी १. कपिल देव : ५ २. अनिल कुंबळे : ४ ३. नॅथन लियॉन : ४ मालिकेत सर्वाधिक बळी १. बिशन सिंग बेदी : ३१ बळी २. क्रेग डेरमॉट : ३१ बळी ३. बीएस. चंद्रशेखर आणि वेन क्लार्क : २८ बळी प्रत्येकी.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया