Ricky Ponting, IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर मालिका २२ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. मालिकेपूर्वीच रिकी पाँटिंगने ऑस्ट्रेलिया मालिका जिंकेल अशी मोठी भविष्यवाणी केली. टीम इंडिया कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला नक्कीच पराभूत करेल, असा अंदाज रिकी पॉन्टिंगने व्यक्त केला आहेच. त्यासोबतच रिकी पाँटिंगने या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूचे नावही निवडले आहे.
रिकी पाँटिंग काय म्हणाला?
मोहम्मद शमीच्या दुखापतीमुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे, असे रिकी पॉन्टिंगने ICC ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. त्याच्या मते, शमीच्या अनुपस्थितीत टीम इंडियासाठी ऑस्ट्रेलियाच्या एका कसोटीत २० विकेट घेणे खूप कठीण होईल. पॉन्टिंग पुढे म्हणाला की, जर आपण मालिकेबद्दल बोललो तर ऑस्ट्रेलिया ही मालिका ३-१ ने जिंकेल. म्हणजे टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला कसोटीत पराभूत करू शकते. तसेच रिकी पाँटिंग म्हणाला की स्टीव्ह स्मिथ या मालिकेत सर्वाधिक धावा करेल.
'हा' भारतीय फलंदाज सर्वाधिक धावा करेल!
रिकी पाँटिंग म्हणाला की जेव्हा रिषभ पंत फलंदाजीला येतो तेव्हा चेंडूची शाइन कमी करतो कारण तो गोलंदाजांची धुलाई करतो. रिषभ पंतचा फॉर्मही अप्रतिम आहे. अशा परिस्थितीत पंत टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करू शकतो, असे दिसते. रिकी पाँटिंग पुढे असेही म्हणाला की, हेजलवूड मालिकेत सर्वाधिक विकेट घेऊ शकतो. तो कमिन्स आणि स्टार्सपेक्षा चांगला गोलंदाज आहे.
ऑस्ट्रेलियात ऋषभ पंतचा विक्रम
रिषभ पंतचा ऑस्ट्रेलियातील रेकॉर्ड अप्रतिम आहे. ऑस्ट्रेलियन भूमीवर रिषभ पंतने ७ कसोटी सामन्यात ६२.४०च्या सरासरीने ६२४ धावा केल्या आहेत. पंतने ऑस्ट्रेलियातही शतक झळकावले आहे. त्याने दोन अर्धशतकेही झळकावली आहेत. गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पंतने टीम इंडियाला गाब्बा येथे कसोटी सामना आणि मालिकाही जिंकून दिली होती.