IND vs AUS Test : रिषभ पंतने 'ते' चॅलेंज स्वीकारले, पेनच्या पत्नीनं दिला पुरावा

IND vs AUS Test: मेलबर्न कसोटीत भारताचा यष्टिरक्षक रिषभ पंत आणि ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक व कर्णधार टीम पेन यांच्यात रंगलेली शेरेबाजी चर्चेत राहिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 03:06 PM2019-01-01T15:06:40+5:302019-01-01T15:06:52+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS Test: Rishabh Pant accepted the challenge, the proof given by Tim Pain's wife | IND vs AUS Test : रिषभ पंतने 'ते' चॅलेंज स्वीकारले, पेनच्या पत्नीनं दिला पुरावा

IND vs AUS Test : रिषभ पंतने 'ते' चॅलेंज स्वीकारले, पेनच्या पत्नीनं दिला पुरावा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाने मेलबर्न कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाला 137 धावांनी पराभूत केले आणि मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. मेलबर्न कसोटीत भारताचा यष्टिरक्षक रिषभ पंत आणि ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक व कर्णधार टीम पेन यांच्यात रंगलेली शेरेबाजी चर्चेत राहिली. पेनने सुरू केलेल्या या शाब्दिक युद्धाला पंतने जशास तसे उत्तर दिले. त्यांच्या या यष्टिमागून सुरू असलेल्या शेरेबाजीचा क्रिकेट चाहत्यांनीही आनंद लुटला. पण, या शेरेबाजीत कांगारूंच्या कर्णधाराने केलेले चॅलेंज पंतने सामन्यानंतर पूर्ण केले. पेनच्या पत्नीनंच त्याचा पुरावा दिला. 

मेलबर्न कसोटीत पंत फलंदाजी करत असताना पेनने त्याला बेबीसिटींगचे चॅलेंज दिले होते. तो म्हणाला होता,''तु कधी मुलांना सांभाळले आहेस का? मला पत्नीसोबत सिनेमा पाहायला जायचा आहे आणि त्याकाळात तु माझ्या मुलांना बघशील का? '' पंतनेही त्याता सडेतोड उत्तर देत 'temporary captain' असा टोमणा हाणला होता. 



पण, सिडनीत दाखल होताच पंतने ऑसी कर्णधाराने चॅलेंज पूर्ण केले. त्याने पंतच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि पेनच्या मुलांसोबत वेळ घालवला. 


पेनची पत्नी बोनी पेन हीने तो फोटो सोशल मीडियावर शेअर केला. 


 वर्षाच्या पहिल्या दिवशी भारत आणि यजमान संघांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या निवसस्थानी भेट दिली. त्यावेळी पेनच्या कुटुंबीयाशी पंतची भेट झाली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 जानेवारीपासून चौथा कसोटी सामना खेळवला जाणार आहे.  

Web Title: IND vs AUS Test: Rishabh Pant accepted the challenge, the proof given by Tim Pain's wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.