Join us  

IND vs AUS Test Series : जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेलाही मुकणार? रोहित शर्माच्या वक्तव्यातून संकेत 

India vs Australia Test Series : भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केव्हा कमबॅक करेल, याची सर्वांना उत्सुकता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 12:23 PM

Open in App

India vs Australia Test Series : भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केव्हा कमबॅक करेल, याची सर्वांना उत्सुकता आहे. मागील जुलै महिन्यापासून बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. पण, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वाच्या कसोटी मालिकेतून तो पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे. मात्र, भारताचा कर्णधार रोहित शर्मा याच्या विधानानं त्या अपेक्षांचा भंग होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनासाठी चमत्कारच अपेक्षित आहे असे अप्रत्यक्ष विधान रोहितने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यानंतर केले. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून तो पुनरागमन करणार होता आणि त्याची निवड झालीही होती. पण, अनफिट असल्याचे बीसीसीआयने जाहीर केले अन् त्याला मघार घ्यावी लागली.

भारतासाठी ट्वेंटी-२० मालिकेपूर्वी आली वाईट बातमी; स्टार फलंदाजाला दुखापत, घ्यावी लागली माघार

''जसप्रीत बुमराहच्या दुखापत कितपत बरी झाली आहे याची कल्पना नाही. पण, तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या दोन कसोटीत पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे. पाठीचं दुखणं हे खूपच गंभीर असते आणि आम्हाला त्याच्याबाबत कोणताच धोका पत्करायचा नाही. त्या मालिकेनंतरही बरंच क्रिकेट खेळायचे आहे,''असे रोहित म्हणाला.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी बीसीसीआयने संघ जाहीर केला आहे. त्यात जसप्रीत बुमराहचा समावेश करण्यात आलेला नाही. बुमराह सध्या NCA मध्ये आहे आणि तो १०० टक्के तंदुरुस्त झाल्यानंतरच पुनरागमन करण्याची शक्यता आहे. ''आम्ही NCA मधील फिजिओ व डॉक्टरांशी सतत संपर्कात आहोत. वैद्यकिय टीम त्याला हवा तितका वेळ देत आहे,''असेही रोहितने सांगितले.  

भारताला ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात वन डे वर्ल्ड कप खेळायचा आहे. मागच्या वर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी नविड समितीने बुमराहला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत खेळवण्याची घाई केली. त्यानंतर बुमराहची दुखापत अधिक बळावली अन् त्याला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप मधून माघार घ्यावी लागली.   

भारताचा कसोटी संघ ( वि. ऑस्ट्रेलिया, फक्त दोन सामन्यांसाठी ) - रोहित शर्मा ( कर्णधार) , लोकेश राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव 

ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ - पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार, ॲश्टन आगर, स्कॉट बोलंड, ॲलेक्स कॅरी, डेव्हिड वॉर्नर, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन. 

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा 9 ते 13 फेब्रुवारी, पहिला कसोटी सामना, नागपूर17 ते 21 फ्रेब्रुवारी, दुसरा कसोटी सामना, दिल्ली1 ते 5 मार्च, तिसरा कसोटी सामना, धर्मशाला9 ते 13 मार्च, चौथा कसोटी सामना, अहमदाबाद

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाजसप्रित बुमराहरोहित शर्मा
Open in App