ind vs aus test series । नवी दिल्ली : सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पहिले 2 सामने जिंकून यजमान भारतीय संघाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. खरं तर पहिल्या दोन्हीही सामन्यात भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव केला. दोन्हीही सामन्यात फिरकीपटू गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीने शानदार फलंदाजी केली. पहिल्या दोन्ही सामन्यात भारतीय फिरकीपटूंनी चमकदार कामगिरी केली होती.
दरम्यान, भारताचा सलामावीर लोकेश राहुल दोन्हीही सामन्यात फ्लॉप ठरला. त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आल्याने तो टीकाकारांच्या निशाण्यावर आला आहे. भारतीय संघाचा माजी खेळाडू व्यंकटेश अय्यर याने तर राहुलची आकडेवारी जाहीर करून त्याच्या खेळीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. याशिवाय राहुलमध्ये युवा खेळाडूंना संधी मिळत नसल्याचे देखील माजी खेळाडूने म्हटले आहे. मात्र, आता संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरनेलोकेश राहुलची पाठराखण करत एक मोठे विधान केले आहे.
गौतम गंभीरने केली पाठराखण "लोकेश राहुलला भारतीय संघातून वगळता कामा नये. कोणत्याही खेळाडूला बाहेर काढता कामा नये. प्रत्येकजण खराब फॉर्मचा सामना करत असतो. त्याला कोणीही सांगू नये की तो चांगली कामगिरी करत नाही. आपल्याला प्रतिभा असलेल्या खेळाडूंच्या पाठीशी उभे राहावे लागेल", असे गौतम गंभीरने पीटीआय या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.
तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"