ठळक मुद्देभारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी चौथा कसोटी सामना 3 जानेवारीपासून सिडनीत सुरु होणार भारतीय संघानी घेतली ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची भेट
सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाने 'बॉक्सिंग डे' कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. भारताने मेलबर्न कसोटीत 137 धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि 41 वर्षांनंतर प्रथमच ऑस्ट्रेलियात दोन कसोटी जिंकण्याचा पराक्रम केला. या कामगिरीसह भारताने 2018चा विजयी निरोप घेतला आणि त्याच आत्मविश्वासाने मालिका खिशात घालण्यासाठी विराटसेना सिडनीत दाखल झाली आहे. वर्षाच्या पहिल्या दिवशी भारत आणि यजमान संघांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या निवसस्थानी भेट दिली. यावेळी कोहलीची पत्नी अनुष्का शर्माने तेथे हजर असूनही एक चूक प्रकर्षाने टाळली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा सामना 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे. भारताला प्रथमच ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची नामी संधी आहे. कोहलीच्या या ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार होण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का सिडनीत आली आहे. तिने पती कोहलीसह दणक्यात नवीन वर्षाचं स्वागतही केलं. कोहलीने सोमवारी दोघांचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले. त्यांच्या या फोटोला चाहत्यांनीही भरभरून दाद दिली. त्यानंतर मंगळवारी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी भेट दिली आणि मॉरिसन यांच्यासोबत फोटोही काढले.
इंग्लंड दौऱ्यातही भारतीय संघाने तेथील भारतीय दुतावासाला भेट दिली. यावेळी कोहलीसह अनुष्काही उपस्थित होती. BCCI ने भारतीय दुतावासाला भेट दिल्याचा फोटो सोशल मीडियावर टाकला. त्यानंतर नेटिझन्सकडून BCCI ची कानउघडणी करण्यात आली होती. BCCI ने पोस्ट केलेल्या फोटोत अनुष्काला पहिल्या रांगेचा मान देण्यात आला आणि कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला चौथ्या रांगेत ठेवल्याने नेटिझन्सने BCCI चे चांगलेच कान टोचले होते.
या प्रसंगातून धडा घेत मंगळवारी अनुष्का ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी भारतीय संघापासून दूरच राहिली. तिने कोहलीसोबत एकटीने फोटो काढला. तिही संघासोबत पंतप्रधानांच्या निवासस्थानी उपस्थित होती. पण, कदाचित तिला इंग्लंड दौऱ्यावर झालेली टीका आठवली असावी आणि तिने संघाच्या फोटोतून स्वतःला लांबच ठेवण्यात धन्यता मानली.
भारतीय संघाचा फोटो बीसीसीआयने प्रसिद्ध केल्यानंतर त्यात अनुष्का न दिसल्याने नेटिझन्सना आश्चर्य वाटले आणि तरिही त्यांनी अनुष्का व बीसीसीआयला ट्रोल करण्याचा प्रयत्न केलाच.
Web Title: IND vs AUS Test: Virat Kohli avoided that mistake, Anushka stayed away from team photo
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.