मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : सामना गमावल्यावर एखादा व्यावसायिक संघ लगेच पुढच्या सामन्याच्या तयारीला लागेल. सरावामध्ये घाम गाळेल. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पराभव झाल्यावर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे डोळे उघडलेले दिसत नाही. तिसऱ्या सामन्यापूर्वी खेळाडूंकडून सराव घेण्यापेक्षा त्यांनी विश्रांती देण्यावर भर दिल्याचे समोर आले आहे.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शास्त्री यांनी सांगितले की, " दुसरा सामना जरी आम्ही गमावला असला तरी आम्हाला विश्रांतीची गरज आहे. पहिल्यांदा आम्ही विश्रांती घेऊ आणि त्यानंतरच सराव करू. पण दुसऱ्या सामन्यानंतर आम्ही विश्रांतीवर अधिक भर देणार आहोत."
संजय मांजरेकर यांनी सोडवला ओपनिंगचा प्रश्नभारताला पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये सलामीची समस्या जाणवत आहे. दोन्ही सामन्यांत लोकेश राहुल आणि मुरली विजय चांगली सलामी देण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यासाठी कोणी ओपनिंग करायची, हा प्रश्न भारतीय संघापुढे असेल. या प्रश्नाचे उत्तर भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी दिले आहे.मांजरेकर यांनी म्हटले आहे की, " दुसऱ्या सामन्यासाठी राहुल आणि विजय या दोघांनाही संघाबाहेर काढायला हवे. तिसऱ्या सामन्यासाठी सलामीवीर म्हणून मयांक अगरवालचे संघात आगमन झाले आहे. त्यामुळे त्याला सलामीची संधी द्यावी. त्याचबरोबर मयांकच्या जोडीला अष्टपैलू हनुमा विहारीला सलामीची संधी द्यायला हवी. कारण त्याची फलंदाजी पाहिल्यावर तो चांगली सलामी देऊ शकतो, असे दिसत आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यासाठी मयांक आणि हनुमा यांनी सलामीला यायला हवे. "
पर्थ कसोटीतील पराभवानंतर भारतीय खेळाडूंच्या कामगिरी बरोबरच कर्णधार विराट कोहलीचा आक्रमकपणा हा चर्चेचा विषय राहिला. कोहलीच्या या आक्रमकतेवर भारताचा माजी कसोटीपटू संजय मांजरेकरसह ऑस्ट्रेलियाचे दिग्गज अॅलन बॉर्डर, माईक हसी आणि मिचेल जॉन्सन यांनी टीका केली. मात्र, भारताचा माजी गोलंदाज झहीर खान याने कोहलीला मैदानावरील आक्रमकता कायम राखण्याचा सल्ला दिला.