Join us  

IND vs AUS: नागपुरातील सामन्यासाठी भारतीय संघात होणार बदल, बुमराहच्या पुनरागमनासह अशी असू शकते प्लेइंग XI

सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये टी-20 मालिकेचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 1:41 PM

Open in App

नवी दिल्ली : सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये टी-20 मालिकेचा थरार रंगला आहे. मोहालीत झालेल्या पहिल्या सामन्यात शानदार विजय मिळवून कांगारूच्या संघाने विजयी सलामी दिली आहे. तर मालिकेतील दुसरा सामना नागपूर येथे खेळवला जाणार आहे. दोन्हीही संघ शहरात पोहचली असून 23 सप्टेंबर रोजी हा सामना होईल. रोहितसेनेला या मालिकेत टिकून राहण्यासाठी उद्याचा सामना 'करा किंवा मरा'असा असणार आहे. मोहालीत झालेल्या सामन्यात खराब गोलंदाजीमुळे भारताला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आगामी सामन्यासाठी संघात बदल होण्याची दाट शक्यता आहे. 

दरम्यान, मागील सामन्यात फिरकीपटू युजवेंद्र चहलला काही खास कामगिरी करता आली नव्हती. आशिया चषकात देखील चहलच्या खेळीवर प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यामुळे नागपुरात होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यासाठी रविचंद्रन अश्विनला संधी दिली जाऊ शकते. तर संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहचे देखील पुनरागमन होण्याची दाट शक्यता आहे. कारण मागच्या सामन्यात भारताच्या वेगवान गोलंदाजांची जोरदार धुलाई झाली होती. 

कार्तिक की पंत कोणाला मिळणार संधी? विश्वचषकासाठी जाहीर केलेल्या संघात दिनेश कार्तिक आणि रिषभ पंत या दोघांनाही संधी मिळाली आहे. पण आता या दोघांपैकी कोणाला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळते हे पाहण्याजोगे असेल. मालिकेतील पहिल्या सामन्यात कार्तिकला संधी मिळाली पण तो फलंदाजीत काही कमाल करू शकला नव्हता. त्यामुळे कदाचित त्याच्या जागी नागपुरातील सामन्यात ऋषभ पंतला संधी मिळू शकते.

अशी असू शकते प्लेइंग XI रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह. 

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह. 

ऑस्ट्रेलियाविरुद्धचे वेळापत्रक  २० सप्टेंबर मोहाली २३ सप्टेंबर - नागपूर २५ सप्टेंबर- हैदराबाद 

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाजसप्रित बुमराहनागपूरटी-20 क्रिकेटरोहित शर्मा
Open in App