IND vs AUS: नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने; भुवनेश्वर कुमारचे पुनरागमन, जाणून घ्या प्लेइंग XI

सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 06:55 PM2022-09-25T18:55:18+5:302022-09-25T18:55:58+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS: Toss goes in favor of India; Bhuvneshwar Kumar Returns, Know Playing XI | IND vs AUS: नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने; भुवनेश्वर कुमारचे पुनरागमन, जाणून घ्या प्लेइंग XI

IND vs AUS: नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने; भुवनेश्वर कुमारचे पुनरागमन, जाणून घ्या प्लेइंग XI

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

हैदराबाद : सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेचा थरार रंगला आहे. आज हैदराबाद येथे मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना होणार आहे. ३ सामन्यांच्या मालिकेतील १-१ सामना जिंकून दोन्हीही संघ इथपर्यंत पोहचले आहेत. मोहाली येथील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने शानदार विजय मिळवून विजयी सलामी दिली होती. तर नागपूर येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने जोरदार कमबॅक करून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.  

आज होणारा सामना निर्णायक सामना असणार आहे. आजचा विजयी संघ मालिकेवर देखील कब्जा करेल. आगामी टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ही मालिका दोन्ही संघासाठी महत्त्वाची मानली जात आहे. लक्षणीय बाब म्हणजे आजच्या सामन्यासाठी भारतीय संघात भुवनेश्वर कुमारचे पुनरागमन झाले आहे. 

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह. 
 

Web Title: IND vs AUS: Toss goes in favor of India; Bhuvneshwar Kumar Returns, Know Playing XI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.