सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवची ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सुरुवात फारशी चांगली झालेली नाही. भारत आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सध्या सराव सामना सुरु आहे. या सराव सामन्यात पहिलाच चेंडू टाकताना उमेशला चक्क लोटांगण घालावे लागले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिलाच चेंडू टाकताना उमेशचा पाय घसरल्याचे पाहायला मिळाले.
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 358 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना क्रिकेट ऑस्ट्रेलिया संघाची 6 बाद 356 अशी स्थिती आहे आणि ते फक्त दोन धावांनी पिछाडीवर आहेत.
कर्णधार विराट कोहलीने क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्धच्या सराव सामन्यात दुसऱ्या दिवशी बॅटवर हात साफ करताना अर्धशतक झळकावले. कोहलीने 87 चेंडूंत 7 चौकार आणि 1 षटकार खेचून 64 धावांचा खेळ केला. कोहलीने ही खेळी करून आगामी कसोटी मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाला धोक्याचा इशारा दिलेला आहे. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्याप्रमाणेच ऑस्ट्रेलियातही कोहलीची बॅट तळपेल, असा त्याच्या चाहत्यांना विश्वास आहे.
भारतीय संघ जेव्हा गोलंदाजीला उतरला तेव्हा मोहम्मद शमीने डावाची सुरुवात केली. त्यानंतर दुसरे षटक टाकायला उमेश यादव सरसावला. पण या षटकातील पहिला चेंडू टाकताना त्याचा पाय घसरला आणि त्याला मैदानात चक्क लोटांगण घालायला लागले.
हा पाहा व्हिडीओ