Join us

बॅड लक फॉर टीम इंडिया! चेंडू स्टंपवर लागला तरी स्टीव्ह स्मिथ Not Out ठरला; कारण...

चेंडू स्टंपवर लागून स्टीव्ह स्मिथ नॉट आउट राहिला. नेमकं काय घडलं जाणून घेऊया सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 16:27 IST

Open in App

IND vs AUS : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील पहिल्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियन संघाला सुरुवातीच्या चेंडूपासून नशीबाची साथ मिळताना दिसली. पहिल्या चेंडूवर ट्रॅविस हेडचा कॅच सुटला. त्यानंतर तो रन आउट होता होता वाचला. तो वरुण चक्रवर्तीच्या जाळ्यात अडकल्यावर हे गुडलक ऑस्ट्रेलियन कॅप्टनस स्टीव्ह स्मिथकडे वळल्याचे दिसले. ऑस्ट्रेलियाच्या डावातील २२ व्या षटकात मोहम्मद शमीला आपल्या गोलंदाजीवर त्याचा कॅच टिपण्याची संधी निर्माण झाली होती. पण यावेळी स्मिथच्या बाबतीत सेम टू सेम ट्रॅविस हेडवाला सीन पाहायला मिळाला. त्याआधी जे घडलं ते तरी सर्वांनाच थक्क करून टाकणारे होते. कारण चेंडू स्टंपवर लागून स्टीव्ह स्मिथ नॉट आउट राहिला. नेमकं काय घडलं जाणून घेऊया सविस्तर

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

चेंडू स्टंपला लागला, पण बेल्स नाही पडली, अन्... 

 

ऑस्ट्रेलियाच्या डावातील १४ व्या षटकात अक्षर पटेल गोलंदाजी करत होता. या षटकातील पाचव्या चेंडूवर टीम इंडियासाठी रन आउटची एक संधी निर्माण झाली. ती चूकली. मग अखेरच्या षटकात अक्षर पटेलनं टाकलेला चेंडू स्मिथच्या पॅडवर लागून थेट हळूहळू स्टंपच्या दिशेन गेला. एवढेच नाही तर स्टंपवरही लागला. पण बेल्स पडली नसल्यामुळे स्टीव्ह स्मिथ नाबाद राहिला. चेंडू टाकणाऱ्या अक्षर पटेलसह भारतीय ताफ्यातील खेळाडूंसाठी आणि हा क्षण बघणाऱ्या भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी हा क्षण आश्चर्यचकित करून सोडणारा होता. 

मिळालेल्या संधीचा चांगलाच घेतला फायदा

भारतीय संघातील गोलंदाज ठराविक अंतराने ऑस्ट्रेलियन संघाला धक्के देत असताना स्टीव्ह स्मिथ मात्र मैदानात तग धरून खेळताना दिसला. मिळालेल्या संधीच सोनं करताना त्याने वनडेत आपल्या खात्यात आणखी एका अर्धशतकाची नोंद केली. आयसीसी स्पर्धेत त्याने पाचव्यांदा ५० पेक्षा अधिक धावा करण्याचा पराक्रम केला. यात एका शतकाचाही समावेश आहे. हे शतक त्याने २०१५ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाविरुद्धच झळकावले होते.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियास्टीव्हन स्मिथअक्षर पटेलभारतीय क्रिकेट संघचॅम्पियन्स ट्रॉफी २०२५