Join us  

IND vs AUS : ठरलं! जसप्रीत बुमराह IPL मधूनच पुनरागमन करणार; पण, दुसऱ्या कसोटीला स्टार खेळाडू मुकणार

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी कसोटी शुक्रवारपासून (१७ फेब्रुवारी) अरुण जेटली स्टेडियमवर खेळवली जाणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 10:10 AM

Open in App

India vs Australia Test Series : पाठीच्या दुखापतीमुळे पहिल्या कसोटीतून बाहेर पडलेला स्टार फलंदाज श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer ) अजूनही राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) 'पुनर्वसन' प्रक्रियेतून जात आहे. यामुळे संघ व्यवस्थापन त्याला दुसऱ्या कसोटी सामन्यात मैदानावर उतरवण्याचा धोका पत्करण्याची शक्यता कमी आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी कसोटी शुक्रवारपासून (१७ फेब्रुवारी) अरुण जेटली स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. पण, यात अय्यरच्या खेळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे पहिल्या कसोटीतील संघच कर्णधार रोहित शर्मा कायम राखण्याची शक्यता अधिक आहे. अय्यरने बंगळुरूमधील एनसीएमध्ये 'पुनर्वसन' कार्यक्रमाचे काही व्हिडिओ पोस्ट केले होते, ज्यात तो  प्रशिक्षक एस रजनीकांत यांच्यासोबत होता. पाठीच्या दुखापतीमुळे अय्यर कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियातून बाहेर पडला आणि नागपूर कसोटी खेळू शकला नाही.

अय्यर 'स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग' प्रशिक्षण घेत आहेत. मात्र राष्ट्रीय संघासोबत आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन करण्याच्या निकषांनुसार त्याला किमान एक देशांतर्गत सामना खेळणे आवश्यक आहे आणि BCCI त्याला इराणी चषक स्पर्धेत खेळण्यास सांगू शकते. तेथे फिटनेस सिद्ध केल्याशिवाय त्याला कसोटीसाठी मैदानात उतरवता येणार नाही. चेतन शर्माच्या नेतृत्वाखालील निवड समिती १ ते ५ मार्च दरम्यान मध्य प्रदेश विरुद्ध इराणी चषक सामन्याला हजेरी लावू शकतात आणि त्या सामन्यात अय्यरच्या फिटनेसवर त्यांचे लक्ष असेल. निवड समितीने रवींद्र जडेजाला फिटनेस सिद्ध करण्यासाठी रणजी सामना खेळण्यास सांगितले होते.

भारतीय गोलंदाजाची काढली विकेट; सौंदर्याची खाण जणू ही 'पुणेकर' अप्सरा!

दुसरीकडे, जसप्रीत बुमराहच्या ‘स्ट्रेस फ्रॅक्चर’मधून सावरण्याची प्रक्रिया अत्यंत संथ आहे. यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन चार सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वन डे सामन्यांमध्ये त्याला खेळवण्याचा धोका पत्करणार नाही. ७ ते ११ जून या कालावधीत लंडनमधील ओव्हल येथे होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद ( WTC Final) स्पर्धेची फायनल होणार आहे आणि तेथे बुमराहची गरज भासू शकते. या वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप  स्पर्धेसाठीही त्याची उपस्थिती महत्त्वाची आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"  

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाश्रेयस अय्यरजसप्रित बुमराहबीसीसीआय
Open in App