India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात पाहुण्यांनी मुसंडी मारली. गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे टीम इंडियाने नागपूर आणि दिल्ली कसोटी सामने जिंकली होती, परंतु त्यानंतर इंदूरमध्ये फलंदाजांच्या फ्लॉप कामगिरीमुळे टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या डावात टीम इंडियाने १०९ धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या डावात टीम इंडिया १६३ धावांवर आटोपली. त्यामुळे त्यांना सामन्यात ९ विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. या निकालानंतर संघातील फलंदाज विराट कोहली ( Virat Kohli) पत्नी अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) सह उजैन येथील महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात दर्शनासाठी पोहोचला.
टीम इंडियाच्या मदतीला केन विलियम्सन धावून आला; रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाचा 'काटा' काढणार आता
टीम इंडियाचे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेली तीन वर्षे भारतीय स्टार फलंदाजांचा फ्लॉप शो सुरू आहे. सलामीवीर केएल राहुल बऱ्याच दिवसांपासून खराब फॉर्मातून जात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या गेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये राहुलची कामगिरी फ्लॉप ठरली होती. गेल्या तीन वर्षातील त्याची कामगिरी पाहता तो ११ कसोटी सामन्यांमध्ये ३०.२८ च्या सरासरीने केवळ ६३६ धावा करू शकला आहे. त्याच्या नावावर फक्त दोन शतके असताना आणि त्याची १२९ धावांची खेळी सर्वोत्तम होती.
कर्णधार रोहित शर्माने नागपूर कसोटी सामन्यात १२० धावांची खेळी केली होती, मात्र त्यानंतर तो विशेष काही करू शकला नाही. गेल्या तीन वर्षातील कामगिरीवर नजर टाकली तर रोहितने भारतासाठी १६ कसोटी सामने खेळले आणि ४४.५५ च्या सरासरीने १२०३ धावा केल्या. तीन वर्षांत त्याला केवळ तीन शतके झळकावता आली आहेत. माजी कर्णधार विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये अजूनही खराब फॉर्मातून जात आहे. त्याचे कसोटी क्रिकेटमधील शेवटचे शतक २०१९ मध्ये झाले होते. तेव्हापासून, कोहलीला भारतासाठी २१ कसोटी सामन्यांमध्ये २७.५० च्या सरासरीने केवळ ९९० धावा करता आल्या.
आम्ही येथे प्रार्थना घेण्यासाठी आलो होतो आणि महाकालेश्वर मंदिरात चांगले दर्शन झाले, असे अनुष्का म्हणाली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"