IND vs AUS : विराट कोहलीला 'गोल्डन चान्स', बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये मोडू शकतो मास्टर ब्लास्टरचा महा रेकॉर्ड!

सचिनचा आणखी एक विक्रम कोहलीच्या निशाण्यावर...! 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 09:51 AM2024-09-02T09:51:23+5:302024-09-02T09:52:23+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS Virat Kohli has Golden Chance, Can Break Master Blaster's Record in Border Gavaskar Trophy | IND vs AUS : विराट कोहलीला 'गोल्डन चान्स', बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये मोडू शकतो मास्टर ब्लास्टरचा महा रेकॉर्ड!

IND vs AUS : विराट कोहलीला 'गोल्डन चान्स', बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये मोडू शकतो मास्टर ब्लास्टरचा महा रेकॉर्ड!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext


भारत आणि ऑस्ट्रेलिया या वर्षाच्या अखेरीस 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहेत. 1991-92 नंतर पहिल्यांदाच दोन्ही संघांमध्ये 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीलासचिन तेंडुलकरचा एक मोठा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी असेल. विराट कोहलीनेसचिन तेंडुलकरचे अनेक आंतरराष्ट्रीय विक्रम मोडले आहेत. मात्र हा विक्रम मोडला तर तो अत्यंत खास असेल. या मालिकेची सुरुवात 22 नोव्हेंबरला पर्थ कसोटी सामन्याने होत आहे. तर शेवटचा सामना 3 जानेवारीपासून सिडनी येथे खेळवला जाणार आहे.

विराट कोहलीला सुवर्णसंधी -
खरे तर, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनण्याची सुवर्णसंधी असेल. या गादीवर सध्या सचिन तेंडुलकर विराजमान आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 20 शतके झळकावली आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडविरुद्ध 19 शतके झळकावणारे डॉन ब्रॅडमन आहेत. या यादीत विराट चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत 16 शतके झळकावली आहेत. यामुळे, विराटने आगामी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये 5 शतके ठोकली तर तो सचिनला मागे टाकून जगातील कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनेल.

कुठल्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक शतके झळकावणारे फलंदाज -
सचिन तेंदुलकर - 20 शतके vs ऑस्ट्रेलिया
डॉन ब्रैडमैन - 19 शतके vs इंग्लंड
सचिन तेंदुलकर - 17 शतके vs श्रीलंका
विराट कोहली - 16 शतके vs ऑस्ट्रेलिया
विराट कोहली - 15 शतके vs श्रीलंका

या बाबतीतही नंबर-1 होण्याची संधी -
विराट कोहलीला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनण्याचीही संधी असेल. सध्या या बाबतीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 11 शतके झळकावली आहेत. विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत 8 कसोटी शतके झळकावली आहेत. आणखी 4 शतके झळकावली तर तो अव्वल स्थानावर पोहोचेल. या यादीत ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ 9 शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज -
सचिन तेंदुलकर - 10 शतके
स्टीव स्मिथ - 8 शतके
सुनील गावस्कर - 8 शतके
विराट कोहली - 8 शतके
रिकी पोंटिंग - 8 शतके
 

Web Title: IND vs AUS Virat Kohli has Golden Chance, Can Break Master Blaster's Record in Border Gavaskar Trophy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.