आधुनिक क्रिकेटच्या युगातील चार सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीतील स्टीव्ह स्मिथ याने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पराभवानंतर वनडेतून निवृत्ती घेतली. त्याने घेतलेल्या या तडकाफडकी निर्णयानंतर भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यातील एक खास क्षण दाखवणाा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथची एक खास झलक पाहायला मिळतीये. या भेटीदरम्यान नेमका दोघांमध्ये काय संवाद झाला ते दोघांनाच माहिती, पण जी चर्चा रंगतीये त्यानुसार, कोहलीनं स्मिथला तुझा हा शेवटचा सामना होता का? असा प्रश्न केला अन् स्मिथनं हो म्हणत किंग कोहलीची गळाभेट घेतली. कोहलीही मग थोडा भावूक झाला. गोडवा दाखवणारा सीन खास ठरण्यामागचं कारण अनेकदा विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यात मैदानात खडाजंगी पाहायला मिळालीये.
स्मिथच्या स्लेजिंगवर विराटचा रिप्लाय
क्रिकेटच्या मैदानात विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यातील सामना म्हणजे कोहली आणि स्मिथ हे अगदी जानी दुश्मन असल्याचा सीन दाखवणाराच. कसोटीसह मर्यादीत षटकांच्या सामन्यात या दोघांनी अनेकदा एकमेकांना खुन्नस दिल्याचे पाहायला मिळाले. २०१६ मधील प्रकरण चांगलेच गाजलं होते. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी विराट कोहलीनं अॅडिलेडच्या मैदानात स्मिथला जशास तसे उत्तर दिले होते. स्मिथचा कॅच घेतल्यावर त्याने ऑस्ट्रेलियन स्लेजिंगवर पटलवार करणारी हावभाव केली होती. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात अनेकदा असा सीन दिसला. कधी विराट तापला अन् स्मिथ गप्प बसला. कधी त्याने विराटला डिवचल्याचे पाहायला मिळाले.
तो मला ऑस्ट्रेलियन असल्यासारखे वाटते, कोहलीसंदर्भात स्मिथच्या मनातली गोष्ट
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यात मैत्रीपूर्ण सीन दिसण्याआधी भारतीय संघाने बॉर्डर गावसकर स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया दौरा केला होता. पाच सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होण्याआधी स्टीव्ह स्मिथनं एक खास मुलाखत दिली होती. यावेळी त्याने विराट कोहलीसंदर्भातील मैत्रीवर भाष्य केले होते. तो म्हणाला होता मैदानात आमची एकमेकांविरुद्ध स्पर्धा असली तरी मैदानाबाहेर आम्ही चांगले मित्र आहोत. आम्ही अधून मधून एकमेकांना मेसेजही करतो. आक्रम अंदाजामुळे विराट कोहली मला ऑस्ट्रेलियन असल्यासारखेच वाटते, आमच्या दोघांच चांगले जमते. असा किस्सा त्याने शेअर केला होता. वनडेतील निवृत्तीनंतर दुबईच्या मैदानात जो सीन दिसला तो स्मिथच्या वक्तव्यातील गोडव्याची आठवण करून देणारा असाच होता.
Web Title: IND vs AUS Virat Kohli Hugs Steve Smith Video Goes Viral Did You Know After Huge Controversy Both Cricketer Now Good Friends
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.