India vs Australia : भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका २-१ अशी जिंकली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची तयारी व्हावी यादृष्टीने भारतासाठी ही मालिका महत्त्वाची होती. पहिला सामना गमावल्यानंतर रोहित शर्मा अँड टीमवर टीका सुरू झाली. त्यात नागपूर कसोटी पावसामुळे होते की नाही अशी शंका होती, परंतु ८-८ षटकांच्या त्या लढतीत भारताने बाजी मारून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. हैदराबादमध्ये विराट कोहली व सूर्यकुमार यादवचे वादळ घोंगावले आणि भारताने मालिका जिंकली. Virat Kohli चा परतलेला फॉर्म ही भारतीय संघासाठी खूप मोठी गोष्ट आहे.
अरेरे किती वाईट! Rishabh Pant सर्वांकडे अपेक्षेने पाहत होता, पण कुणी लक्षच दिले नाही, Video
भारताचा माजी कर्णधार विराटी त्याच्या कामगिरीवर आनंदी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांत विराटला १३ धावाच करता आल्या होत्या, परंतु हैदराबाद येथील सामन्यात त्याने सूर्यकुमार यादवसह १०४ धावांची भागीदारी करताना संघाचा डाव सावरला. सूर्याने ३६ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकारांसह ६९ धावांची खेळी केली. त्याला प्लेअर ऑफ दी मॅचचा पुरस्कारही दिला गेला. विराटनेही ४८ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ६३ धावा करून आपलं काम केलं. या मालिकेत विराटला एनर्जेटिक खेळाडू या पुरस्काराने गौरविण्यात आलं अन् त्याचा चेक स्वीकारल्यानंतर विराट धावत सुटला. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.