अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने शतक झळकावले. एकदिवसीय क्रिकेटमधील हे कोहलीचे 39वे शतक ठरले. पण या शतकाच्या निमित्ताने एक योगायोग पाहायला मिळाला आहे. कोहलीसाठी 15 जानेवारी ही तारीख खास ठरते आहे, पण का...
कर्णधार विराट कोहलीने अॅडलेड वन डे सामन्यात खणखणीत शतक झळकावून भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. कोहलीने या खेळीसह वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये 11 वे स्थान पटकावले. त्याचे हे वन डेतील 39वे शतक ठरले. त्यासह त्याचे हे 64वे आंतरराष्ट्रीय शतक ठरले. मागील 19 वन डे सामन्यांतील कोहलीचे हे 9 वे शतक ठरले. याच विक्रमाबरोबर त्याने सचिन तेंडुलकर आणि मोहम्मद अझरुद्दीन यांना न जमलेला पराक्रम केला.
कोहलीने 15 जानेवारी 2017 साली एकदिवसीय क्रिकेटमध्येच शतक झळकावले होते. त्यानंतर 2018 साली दक्षिण आफ्रिकेमध्ये 15 जानेवारीलाच कसोटी सामन्यात शतक झळकावले होते. कोहलीचे 39वे शतकही यावेळी 15 जानेवारी याच दिवशी झाले आहे. त्यामुळे 15 जानेवारी ही तारीख कोहलीसाठी लकी असल्याचे म्हटले जात आहे.