IND vs AUS: Virat Kohli २ धावांवर बाद होताच नेटकरी पुन्हा खवळले, म्हणाले- 'हाच तुझा खरा फॉर्म'

गेल्या सामन्यात शतक ठोकणारा कोहली स्वस्तात तंबूत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 09:23 PM2022-09-20T21:23:10+5:302022-09-20T21:23:52+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS Virat Kohli trolled for getting out cheaply in 1st T20 social media | IND vs AUS: Virat Kohli २ धावांवर बाद होताच नेटकरी पुन्हा खवळले, म्हणाले- 'हाच तुझा खरा फॉर्म'

IND vs AUS: Virat Kohli २ धावांवर बाद होताच नेटकरी पुन्हा खवळले, म्हणाले- 'हाच तुझा खरा फॉर्म'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Virat Kohli, IND vs AUS: T20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाचा सामना वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाशी होत आहे. पंजाबमधील मोहाली येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला टी-२० सामना खेळला. त्यात भारताने प्रथम फलंदाजी केली. या मोठ्या सामन्यात टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि तो केवळ २ धावा करत माघारी परतला. आशिया चषकाच्या शेवटच्या सामन्यात विराट कोहलीने १२२ धावांची तुफानी खेळी केली होती. ७१वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावल्यानंतर विराट कोहलीचा हा पहिलाच सामना होता. पण तो अप्रतिम खेळी करण्यात अयशस्वी ठरला.

मोहालीमधील मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात विराट कोहलीने एकूण ७ चेंडू खेळले, त्यामध्ये त्याला केवळ २ धावा करता आल्या. पहिल्या तीन चेंडूंमध्ये विराट कोहली एकही धाव घेऊ शकला नव्हता. नंतर मिड-ऑनला नॅथन एलिसच्या चेंडूवर त्याने २ धावा केल्या. आणि नंतर विराट कोहली साधा झेल देत बाद झाला. विराट कोहली अपयशी ठरल्यानंतर त्याला पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. 'विराट कोहलीचा जबरदस्त फॉर्म केवळ एका सामन्यासाठी होता, त्याचा खरा फॉर्म हाच आहे', अशा आशयाचे ट्विट्स करत त्याला ट्रोल करण्यात आले.

--

--

--

दरम्यान, विराट कोहलीने आशिया कपमध्ये चांगली कामगिरी केली होती. टीम इंडियाला सुपर-4 मध्ये स्थान मिळण्यामागे विराट कोहलीच्या धावांचे योगदान होते. भारताने आपला शेवटचा सामना अफगाणिस्तानविरुद्ध खेळला तेव्हा विराट कोहलीने नाबाद १२२ धावा केल्या होत्या. विराट कोहलीचे हे T20 मधील पहिले शतक होते. तसेच आशिया चषकातील तो सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज ठरला होता.

Web Title: IND vs AUS Virat Kohli trolled for getting out cheaply in 1st T20 social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.