चेन्नई, दि. 17 - निम्मा संघ तंबूत परतल्यानंतर हार्दिक पांड्या आणि महेंद्र सिंग धोनीने शतकी भागीदारी करत भारताचा डाव सावरला. दोघांनी केलेल्या जबरदस्त भागीदारीच्या जोरावर भारताने दोनशेपार मजल मारली आहे. दरम्यान, अष्टपैलू हार्दिक पांड्याने तुफानी फटकेबाजी केली. त्याने अॅडम झम्पाच्या एकाच षटकात 24 धावा वसूल करत आपले अर्धशतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर वर्चस्व गाजवणारा पांड्या शतक पूर्ण करणार असे वाटत होते. पण 66 चेंडूत 83 धावा फटकावून तो बाद झाला.
तत्पूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर अजिंक्य रहाणे (5), कर्णधार विराट कोहली (0), मनीष पांडे (0) आणि रोहित शर्मा (28) हे झटपट बाद झाल्याने 16 व्या षटकात भारताची अवस्था 4 बाद 64 अशी झाली होती. त्यानंतर एक बाजू लावून धरणारा केदार जाधवही 40 धावांवर बाद झाल्याने भारताची अवस्था
अंतिम 11मध्ये भारतीय संघात अजिंक्य रहाणे आणि हार्दिक पांड्याला संधी देण्यात आली आहे. तर गोलंदाजीत भुवनेश्वर आणि बुमराहवर विश्वास कायम ठेवला आहे. तर कुलदिप यादव आणि चहलवर फिरकीची जबाबदारी असेल. रोहित शर्मा -आजिंक्य रहाणे सलामीला येतील. श्रीलंकेचा सफाया केल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या विराट सेना आता सामना कांगारुंशी होत आहे. पाच वन-डे सामन्याच्या मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. गेल्या काही वर्षांत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान क्रिकेट मैदानावर चुरस दिसून आली. कसोटी मालिकेत उभय संघांतील खेळाडूंचा उत्साह अनुभवायला मिळाला. त्यात भारताने २-१ ने सरशी साधली होती.
ऑस्ट्रेलियाचा ५-० ने पराभव केला, तर भारताला आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावता येईल, तर ४-१ ने विजय मिळवला तर ऑस्ट्रेलिया संघ अव्वल स्थान पटकावेल. ऑस्ट्रेलिया संघ दोन अव्वल वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क व जोश हेजलवूड यांच्याशिवाय येथे आला असला तरी स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर व ग्लेन मॅक्सवेल यांच्या उपस्थितीत पाहुणा संघ आक्रमक आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी भारत हे दुसरे घर असल्याप्रमाणेच आहे. उभय संघांनी सामन्यापूर्वी कसून सराव केला आहे.
उभय संघ येथे तीन दशकांनंतर वन-डे सामना खेळत आहेत. येथे १९८७ मध्ये रिलायन्स विश्वकप स्पर्धेत उभय संघांदरम्यान अखेरचा वन-डे सामना खेळला गेला होता. त्यात ऑस्ट्रेलियाने एका धावेने विजय मिळवला होता. आॅस्ट्रेलियाने भारतात अखेरची द्विपक्षीय मालिका २०१३ मध्ये खेळली होती. सात सामन्यांच्या मालिकेतील अखेरचे दोन सामने खराब वातावरणामुळे रद्द झाले होते.