IND vs AUS Warm Up Match Live : 2,2,W,W,W,W! २०व्या षटकात गोलंदाजीला आला अन् सामनाच फिरवला, भारताने रोमहर्षक विजय मिळवला

लोकेश राहुल ( KL Rahul) व सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) यांच्या अर्धशतकाने भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 01:04 PM2022-10-17T13:04:43+5:302022-10-17T13:05:22+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS Warm Up Match Live : 2,2,W,W,W,W by Shami in the 20th over while defending 11 runs, India have defeated Australia by 6 runs. | IND vs AUS Warm Up Match Live : 2,2,W,W,W,W! २०व्या षटकात गोलंदाजीला आला अन् सामनाच फिरवला, भारताने रोमहर्षक विजय मिळवला

IND vs AUS Warm Up Match Live : 2,2,W,W,W,W! २०व्या षटकात गोलंदाजीला आला अन् सामनाच फिरवला, भारताने रोमहर्षक विजय मिळवला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australi Warm Up Match Live : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सराव सामन्यात भारतीय फलंदाज मोठ्या मैदानाचा अंदाज बांधण्यात चुकले. लोकेश राहुल ( KL Rahul) व सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) यांच्या अर्धशतकाने भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. ऑसी कर्णधार अ‍ॅरोन फिंचने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. हर्षल पटेलने टाकलेल्या १९व्या षटकात ऑसींच्या दोन विकेट्स पडल्याने सामन्यातील चुरस वाढली. प्लेइंग इलेव्हनमध्ये नसलेल्या मोहम्मद शमी ( Mohammad Shami) २०वे षटक टाकण्यासाठी आला आणि त्याने सामनाच फिरवला.


ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या मैदानावर लोकेशने उत्तुंग फटके खेचले. त्यापैकी ३ प्रयत्न थेट स्टेडियममध्ये पोहोचले. लोकेशने २७ चेंडूंत ५० धावा करताना ३ षटकार व ६ चौकार खेचले. मोठ्या मैदानांवर षटकार मारणे सोपे नक्कीच नाही. अशाच एका प्रयत्नात लोकेश झेलबाद झाला. ग्लेन मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर लोकेशने मारलेला फटका अ‍ॅश्टन अ‍ॅगरने टिपला. लोकेश ३३ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ५७ धावा करून बाद झाला. त्यानंतर अ‍ॅगरच्या गोलंदाजीवर रोहितने ( १५) स्वीप शॉट खेचला अन् मॅक्सवेलने सीमारेषेवर झेल टिपला. 

मिचेल स्टार्कच्या बाऊन्सरवर विराट कोहली १९ धावांवर Fine Lageला झेलबाद झाला. पुढच्याच षटकात केन रिचर्डसनच्या शॉर्ट चेंडूवर हार्दिक ( २) झेलबाद झाला. दिनेश कार्तिकने फटक्यांमध्ये वैविधता ठेऊन धावफलक हतला ठेवला, पंरतु तोही ( २० धावा, १४ चेंडू) रिचर्डसनच्या गोलंदाजीवर सीमारेषेवर मॅक्सवेलकरवी झेलबाद झाला. ऑस्ट्रेलियाने कमबॅक केले. सूर्यकुमार यादवने चांगली फटकेबाजी केली. त्याने ३३ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ५० धावा केल्या. भारताने ७ बाद १८६ धावा केल्या. केन रिचर्डसनने चार विकेट्स घेतल्या. 

यजमान ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांना सडेतोड उत्तर दिले. मिचेल मार्श व अ‍ॅरोन फिंच यांनी पॉवर प्लेमध्ये ६४ धावा चोपल्या. १८ चेंडूत ४ चौकार व २ षटकारांसह ३५ धावा करणाऱ्या मार्शचा सहाव्या षटकात भुवनेश्वर कुमारने त्रिफळा उडवला. स्टीव्हन स्मिथ ( ११) युजवेंद्र चहलच्या फिरकीवर त्रिफळाचीत झाला. फिंच एकाबाजूने चांगली फटकेबाजी करत होता. त्याने अर्धशतक पूर्ण केले. मॅक्सवेलचा १९ धावांवर युजवेंद्र चहलने स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल सोडला.  पण, भुवनेश्वर कुमारने १६व्या षटकात मॅक्सवेलला ( २३) बाद केले, मार्कस स्टॉयनिस ( ७) अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर बाद झाला. फिंच किल्ला लढवत होता. 

१२ चेंडूंत विजयासाठी १६ धावा हव्या असताना हर्षल पटेलने संथ चेंडूवर फिंचचा त्रिफळा उडवला. त्याने ५४ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ७९ धावांची खेळी केली. पुढच्याच षटकात विराटने अप्रतिम क्षेत्ररक्षण करताना टीम डेव्हिडला रन आऊट केले.  हर्षलच्या त्या षटकात ५ धावा गेल्या, परंतु दोन महत्त्वाच्या विकेट्स मिळाल्या. ऑसींना ६ चेंडूंत ११ धावा करायच्या होत्या. मोहम्मद शमी २०व्या षटकात पहिले षटक टाकण्यासाठी आला. विराटने सीमारेषेवर अफलातून झेल घेतला. पॅट कमिन्सच्या झेलने सर्वच अवाक् झाले. त्यानंतर अॅश्टन अॅगर रनआऊट झाला. पुढील दोन चेंडूत शमीने जॉश इंग्लिस व केन रिचर्डसन यांचा त्रिफळा ऊडवून टीम हॅटट्रिक पूर्ण केली. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ १८० धावांत माघारी परतला. भारताने ६ धावांनी सामना जिंकला 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: IND vs AUS Warm Up Match Live : 2,2,W,W,W,W by Shami in the 20th over while defending 11 runs, India have defeated Australia by 6 runs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.