Join us  

IND vs AUS Warm Up Match Live : ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली; Virat Kohli आजही खेळणार नाही? रोहित शर्माने सांगितली playing XI

India vs Australi Warm Up Match Live : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या लढतीपूर्वी भारतीय संघाला दोन सराव सामने खेळायचे आहे आणि रोहित शर्मा अँड कंपनीसाठी संघाची घडी मजबूत करण्याची हिच संधी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 9:11 AM

Open in App

India vs Australi Warm Up Match Live : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या लढतीपूर्वी भारतीय संघाला दोन सराव सामने खेळायचे आहे आणि रोहित शर्मा अँड कंपनीसाठी संघाची घडी मजबूत करण्याची हिच संधी आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवले आहे आणि त्यामुळेच आता आयसीसी स्पर्धेत भारत १५ वर्षांचा दुष्काळ संपवेल अशी सर्वांना अपेक्षा आहे. आज भारतीय संघ पहिल्या सराव सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा सामना भारताला वर्ल्ड कप तयारीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

MS Dhoniमुळे पाकिस्तानी खेळाडूंच्या मनात भीती बसलीय, म्हणून... ! वासीम अक्रमने व्यक्त केली नाराजी

रवींद्र जडेजा व जसप्रीत बुमराह हे दोन धक्के पचवून भारतीय संघाला या वर्ल्ड कप स्पर्धेत खेळ करावा लागणार आहे. त्यात दीपक चहर ( Deepak Chahar)ने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेतली. बीसीसीआयने जसप्रीतच्या जागी मुख्य संघात मोहम्मद शमीचे ( Mohammad Shami) नाव जाहीर केले, तर मोहम्मद सिराज आणि शार्दूल ठाकूर हे राखीव गोलंदाज म्हणून ऑस्ट्रेलियात दाखल झाले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेआधी शमीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि त्यालाही माघार घ्यावी लागली. मागील ट्वेंटी-२० वर्ल्ड कप नंतर शमी मर्यादित षटकांचे सामने खेळलेला नाही. त्यामुळे त्याच्या फिटनेसची चाचणी करण्यात आली आणि  तो तंदुरुस्त असल्याचे जाहीर केले. शमी ८ नोव्हेंबर २०२१ मध्ये अखेरचा ट्वेंटी-२० सामना खेळला होता.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्माने हे आव्हान स्वीकारले, प्रथम फलंदाजी करून तडगे आव्हान ठेवण्याचा निर्धार बोलून दाखवला. १५ वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दित प्रथमच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत कर्णधारपद भूषवित असल्याचा अभिमान वाटतोय, असेही रोहित म्हणाला. दरम्यान आजच्या सामन्यात विराट कोहली खेळणार आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन्ही सराव सामन्यांत विराट खेळला नव्हता. 

भारताची प्लेइंग इलेव्हन ( India's playing XI) - रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, आर अश्विन, हर्षल पटेल, भुनवेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग ( Rohit (C), Rahul, Virat, Surya, Hardik, Karthik (WK), Axar, Ashwin, Harshal, Bhuvi and Arshdeep.) 

MS Dhoniमुळे पाकिस्तानी खेळाडूंच्या मनात भीती बसलीय, म्हणून... ! वासीम अक्रमने व्यक्त केली नाराजी

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
Open in App