Join us  

IND vs AUS Warm Up Match Live : चिते की चाल, बाज की नजर...! Virat Kohli ने अफलातून रन आऊट केला अन् नंतर अविश्वसनीय झेल टिपला, Video 

India vs Australi Warm Up Match Live : भारतीय संघाने पहिल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियावर ६ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. हर्षल पटेल व मोहम्मद शमी यांनी अखेरच्या दोन षटकांत सामना फिरवला. मात्र, हिरो विराट कोहली ( Virat Kohli) ठरला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 1:31 PM

Open in App

India vs Australi Warm Up Match Live : भारतीय संघाने पहिल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियावर ६ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. लोकेश राहुल ( KL Rahul) व सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने १८७ धावांचे लक्ष्य उभे केले. ऑसी कर्णधार अ‍ॅरोन फिंचने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. पण, हर्षल पटेल व मोहम्मद शमी यांनी अखेरच्या दोन षटकांत सामना फिरवला. मात्र, हिरो विराट कोहली ( Virat Kohli) ठरला. त्याने १९व्या षटकात चित्त्याच्या वेगाने अफलातून Run Out केला अन् २०व्या षटकात गरुझासारखी झेप घेत अविश्वसनीय झेल टिपला.  

2,2,W,W,W,W! २०व्या षटकात गोलंदाजीला आला अन् सामनाच फिरवला, भारताने रोमहर्षक विजय मिळवला

 

लोकेशने ३३ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ५७ धावा केल्या. रोहित शर्मा ( १५), विराट कोहली ( १९), हार्दिक पांड्या (२) व दिनेश कार्तिक (२०) अपयशी ठरले. सूर्यकुमार यादवने ३३ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ५० धावा केल्या. भारताने ७ बाद १८६ धावा केल्या. केन रिचर्डसनने चार विकेट्स घेतल्या. यजमान ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांना सडेतोड उत्तर दिले. मिचेल मार्श व अ‍ॅरोन फिंच यांनी पॉवर प्लेमध्ये ६४ धावा चोपल्या. १८ चेंडूत ४ चौकार व २ षटकारांसह ३५ धावा करणाऱ्या मार्शचा सहाव्या षटकात भुवनेश्वर कुमारने त्रिफळा उडवला. स्टीव्हन स्मिथ ( ११) , ग्लेन मॅक्सवेल ( २३), मार्कस स्टॉयनिस ( ७) हे झटपट बाद झाले.

१२ चेंडूंत विजयासाठी १६ धावा हव्या असताना हर्षल पटेलने संथ चेंडूवर फिंचचा त्रिफळा उडवला. त्याने ५४ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ७९ धावांची खेळी केली. पुढच्याच षटकात विराटने अप्रतिम क्षेत्ररक्षण करताना टीम डेव्हिडला रन आऊट केले.  हर्षलच्या त्या षटकात ५ धावा गेल्या, परंतु दोन महत्त्वाच्या विकेट्स मिळाल्या. ऑसींना ६ चेंडूंत ११ धावा करायच्या होत्या. मोहम्मद शमी २०व्या षटकात पहिले षटक टाकण्यासाठी आला. विराटने सीमारेषेवर अफलातून झेल घेतला. पॅट कमिन्सच्या झेलने सर्वच अवाक् झाले. त्यानंतर अॅश्टन अॅगर रनआऊट झाला. पुढील दोन चेंडूत शमीने जॉश इंग्लिस व केन रिचर्डसन यांचा त्रिफळा ऊडवून टीम हॅटट्रिक पूर्ण केली. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ १८० धावांत माघारी परतला. भारताने ६ धावांनी सामना जिंकला 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२विराट कोहलीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामोहम्मद शामी
Open in App