Join us  

गौतम गंभीरचा Virat Kohli ला सल्ला : देशासाठी धावा कर, विक्रमावर लक्ष केंद्रीत करू नकोस! इंग्लंड फायनल खेळणार असल्याचा दावा

India vs Australi Warm Up Match Live : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सराव सामना ब्रिस्बेन येथे सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 9:57 AM

Open in App

India vs Australi Warm Up Match Live : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सराव सामना ब्रिस्बेन येथे सुरू आहे. लोकेश राहुल व रोहित शर्मा यांनी ४ षटकांत फलकावर ४३ धावा चढवल्या आहेत आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यापैकी ३९ धावा लोकेशने केल्या आहेत. रोहितने ४ षटकांत केवळ २ चेंडूंचा सामना करताना शून्य धावा केल्या आहेत. या सामन्यात सर्वांचे लक्ष असेल ते विराट कोहली ( Virat Kohli)च्या कामगिरीकडे. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन सराव सामन्यांत तो खेळला नव्हता. पण, आज त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश आहे. त्याला माजी सलामीवीर गौतम गंभीर ( Gautam Gambhir) याने सल्ला दिलाय. 

रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवले आहे आणि त्यामुळेच आता आयसीसी स्पर्धेत भारत १५ वर्षांचा दुष्काळ संपवेल अशी सर्वांना अपेक्षा आहे.ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्माने हे आव्हान स्वीकारले, प्रथम फलंदाजी करून तडगे आव्हान ठेवण्याचा निर्धार बोलून दाखवला. १५ वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दित प्रथमच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत कर्णधारपद भूषवित असल्याचा अभिमान वाटतोय, असेही रोहित म्हणाला. दरम्यान आजच्या सामन्यात विराट कोहली खेळणार आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन्ही सराव सामन्यांत विराट खेळला नव्हता. 

गौतम गंभीर काय म्हणाला?स्टार स्पोर्ट्स वाहिनीशी बोलताना तो म्हणाला, विराट कोहलीने भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्यासाठी धावा करून मदत करायला हवी, वैयक्तिक विक्रमावर लक्ष केंद्रीत करायला नको. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंड फायनलमध्ये प्रवेश करेल आणि भारत किंवा पाकिस्तान यापैकी एक दुसरा फायनलिस्ट असेल. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियागौतम गंभीरविराट कोहली
Open in App