India vs Australi Warm Up Match Live : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सराव सामना ब्रिस्बेन येथे सुरू आहे. लोकेश राहुल व रोहित शर्मा यांनी ४ षटकांत फलकावर ४३ धावा चढवल्या आहेत आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यापैकी ३९ धावा लोकेशने केल्या आहेत. रोहितने ४ षटकांत केवळ २ चेंडूंचा सामना करताना शून्य धावा केल्या आहेत. लोकेशने दमदार फटकेबाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना हैराण केले. त्याने २७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. भारताने पहिल्या ६ षटकांत ६९ धावा केल्या आणि त्यात रोहितच्या १३ धावांचे योगदान राहिले.
रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवले आहे आणि त्यामुळेच आता आयसीसी स्पर्धेत भारत १५ वर्षांचा दुष्काळ संपवेल अशी सर्वांना अपेक्षा आहे.ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्माने हे आव्हान स्वीकारले, प्रथम फलंदाजी करून तडगे आव्हान ठेवण्याचा निर्धार बोलून दाखवला. १५ वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दित प्रथमच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत कर्णधारपद भूषवित असल्याचा अभिमान वाटतोय, असेही रोहित म्हणाला. दरम्यान आजच्या सामन्यात विराट कोहली खेळणार आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन्ही सराव सामन्यांत विराट खेळला नव्हता. ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या मैदानावर लोकेशने उत्तुंग फटके खेचले. त्यापैकी ३ प्रयत्न थेट स्टेडियममध्ये पोहोचले. लोकेशने २७ चेंडूंत ५० धावा करताना ३ षटकार व ६ चौकार खेचले. रोहित नॉन स्ट्रायकरला उभा राहून लोकेशची फटकेबाजी पाहत होता. ६९ धावांत रोहितने १० चेंडूंत १३ धावा केल्या आहेत. लोकेश ३३ चेंडूत ५७ धावांवर बाद झाला. भारताला ७८ धावांवर पहिला धक्का बसला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"