India vs Australi Warm Up Match Live : भारतीय संघाने पहिल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियावर ६ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. लोकेश राहुल ( KL Rahul) व सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने १८७ धावांचे लक्ष्य उभे केले. ऑसी कर्णधार अॅरोन फिंचने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. पण, हर्षल पटेल व मोहम्मद शमी यांनी अखेरच्या दोन षटकांत सामना फिरवला. भारताने जरी सामना जिंकला असला तरी त्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येतेय. जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, दीपक चहर यांच्यानंतर रिषभ पंतही ( Rishabh Pant Injured) दुखापतग्रस्त असल्याचे वृत्त समोर येतेय.
ऑस्ट्रेलियावरील विजयानंतरही रोहित शर्मा नाराज; सूर्यकुमारचा दाखल देत टोचले इतरांचे कान
लोकेशने ३३ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ५७ धावा केल्या. रोहित शर्मा ( १५), विराट कोहली ( १९), हार्दिक पांड्या (२) व दिनेश कार्तिक (२०) अपयशी ठरले. सूर्यकुमार यादवने ३३ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ५० धावा केल्या. भारताने ७ बाद १८६ धावा केल्या. केन रिचर्डसनने चार विकेट्स घेतल्या. यजमान ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांना सडेतोड उत्तर दिले. मिचेल मार्श ( ३५) व अॅरोन फिंच यांनी पॉवर प्लेमध्ये ६४ धावा चोपल्या. स्टीव्हन स्मिथ ( ११) , ग्लेन मॅक्सवेल ( २३), मार्कस स्टॉयनिस ( ७) हे झटपट बाद झाले. १२ चेंडूंत विजयासाठी १६ धावा हव्या असताना हर्षल पटेल व मोहम्मद शमीन यांनी सहा विकेट्स घेतल्या आणि केवळ ९ झावा दिल्या. शमीने चार चेंडूंत सलग चार ( एक रन आऊट) धक्के देताना संघाची हॅटट्रिक पूर्ण केली आणि ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ १८० धावांत माघारी पाठवला.
चिते की चाल, बाज की नजर...! Virat Kohli ने अफलातून रन आऊट केला अन् नंतर अविश्वसनीय झेल टिपला
या सामन्यात रिषभ पंतला खेळवले गेले नाही. तो स्टँडमध्ये बसून मॅच पाहत होता, परंतु त्याचवेळी त्याच्या गुडघ्यावर आईस बॅग व मोठी पट्टी बांधली गेल्याचे दिसले. त्याच्या गुडघ्याला दुखापत झाल्याचा अंदाज या फोटोवरून लावला जातोय. BCCI ने अद्यात अधिकृत काहीच माहिती दिलेली नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IND vs AUS Warm Up Match Live : Rishabh Pant Injured? Another blow to the Indian team, the wicketkeeper's photo goes viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.