India vs Australia, 4th Test Day 4 : वॉशिंग्टन सुंदर ( Washington Sunder) याने कारकिर्दीच्या पहिल्याच कसोटीत कमाल करून दाखवली. तीन विकेट्स घेणाऱ्या सुंदरनं फलंदाजीतही अनपेक्षित खेळी करताना ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना धापा टाकण्यास भाग पाडले. सुंदरनं १४४ चेंडूंचा सामना करताना ६२ धावा केल्या. त्यानं सातव्या विकेटसाठी शार्दूल ठाकूरसह ( Shardul Thakur) १२३ धावांची विक्रमी भागीदारी केली. त्यामुळे रविवारी सोशल मीडियावर आणि सर्वत्रच सुंदरच्या नावाची चर्चा होती. भारतीय क्रिकेटप्रेमी सुंदरचे कौतुक करत होते, परंतु त्याचे वडील एम सुंदर ( M Sunder) निराश होते. 'वॉशिंग्टन' नावामागची हृदयस्पर्शी कथा; जाणून पाणावतील डोळे!
भारताचे आघाडीचे सहा फलंदाज १८६ धावांवर माघारी परतले होते आणि ऑस्ट्रेलिया १८३ धावांनी पुढे होते. त्यावेळी सुंदर आणि ठाकूर यांनी खेळपट्टीवर ठाण मांडला. या दोघांनी विक्रमी कामगिरी करताना पिछाडी ३३ धावांनी कमी केली. संयमी, चिकाटी दाखवताना सुंदरनं दमदार फलंदाजी केली. पण, त्याने शतक पूर्ण केले असते तर वडिलांना अधिक आवडले असते. त्यांच्या मते सुंदरमध्ये फलंदाजी करण्याची क्षमता आहे.
एम सुंदर (M Sundar) यांनी सांगितले की,''तो शतक पूर्ण करू शकला नाही, म्हणून मी निराश आहे. जेव्हा सिराज फलंदाजीला आला तेव्हा सुंदरने चौकार-षटकार खेचायला हवे होते. तो हे करू शकला असता. त्यानं पुल शॉट्स आणि मोठे फटके मारायला हवे होते. त्यानं ऑस्ट्रेलियाच्या धावांची बरोबरी करण्याचा प्रयत्न करायला हवा होता.'' वॉशिंग्टन सुंदर-शार्दूल ठाकूरनं मोडले अनेक विक्रम; ७४ वर्षांनंतर प्रथमच घडला पराक्रम
सुंदरशी माझं रोज बोलणं होतं आणि एक दिवसाआधीही बोललो होतो, असे त्यांनी सांगितले. तेव्हा त्यांनी सांगितले होते की, ''संधी मिळाली तर मोठी खेळी कर. नक्कीच प्रयत्न करिन असे तो म्हणाला होता.'' पदार्पणात अर्धशतक व तीन विकेट्स घेणारा तो भारताचा दुसरा खेळाडू आहे. यापूर्वी दत्तू फडकर यांनी प्रथमच ऑस्ट्रेलियाचा दौरा करणाऱ्या भारतीय संघासाठी ही कामगिरी केली होती. ब्रिस्बेन कसोटीत सुंदरला सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली, परंतु तो सलामीला खेळतो. MS Dhoniनंतर टीम इंडियासाठी वॉशिंग्टन सुंदरनं केला विक्रम, शार्दूल ठाकूरसह सावरला डाव
Web Title: IND vs AUS : Washington sundar father m sundar is not happy with his son performance want century
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.