Join us  

Ind Vs Aus, WTC Final 2023: WTC फायनलसाठी ऑस्ट्रेलियाने जाहीर केला तगडा संघ; टीम इंडियाविरुद्ध होणार ७ जूनला सामना

Ind Vs Aus, WTC Final 2023: जागतिक कसोटी चॅम्पियनशिप आणि अॅशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा निवडलेला संघ मजबूत दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 8:52 AM

Open in App

 WTC Final 2023:  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रिलिया संघात होणार आहे. हा अंतिम सामना ७ जूनपासून इंग्लंडमध्ये खेळवण्यात येणार आहे. याचदरम्यान ऑस्ट्रेलियाने WTC फायनलसाठी १७ खेळाडूंचा संघ निवडला आहे, त्याचे नेतृत्व पॅट कमिन्स करणार आहे. 

जागतिक कसोटी चॅम्पियनशिप आणि अॅशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा निवडलेला संघ मजबूत दिसत आहे. अष्टपैलू मिचेल मार्श पूर्णपणे तंदुरुस्त होऊन संघात परतला आहे. मिचेल मार्शला  तब्बल ४ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात स्थान मिळालं आहे. तसेच डेव्हिड वॉर्नरलाही संघात सामील करण्यात आलं आहे. 

डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांचा सलामीवीर म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे, तर मार्कस हॅरिसचाही सलामीवीर म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. संघात चार स्पेशलिस्ट वेगवान गोलंदाज आहेत, कर्णधार पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि स्कॉट बोलंड याशिवाय अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीन आणि मार्श. याशिवाय नॅथन लायन आणि टॉड मर्फी यांचा फिरकी जोडी म्हणून संघात समावेश आहे.

WTC फायनल आणि ऍशेससाठी ऑस्ट्रेलियाचा संघ

पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (विकेटकिपर), अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, स्कॉट बोलँड, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोस इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅट रेनशॉ. , मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.

दरम्यान, सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासह बहुतांश खेळाडू हे वेगवेगळ्या संघांकडून खेळत आहेत. मात्र असं असलं तरी टीम इंडियाचं लक्ष आयपीएल आटोपल्यावर होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याकडे आहे. हा सामना ७ जूनपासून खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाआॅस्ट्रेलियाभारत
Open in App