IND vs BAN 1st ODI : १९, ०, २,० ! ४ धावा ४ विकेट्स, भारताचे ऑलराऊंडर ठरले फेल; ५० षटकं पूर्ण खेळण्याचे झालेत वांदे

India vs Bangladesh 1st ODI Live Update : वन डे वर्ल्ड कप २०२३ च्या तयारीचा निर्धार करून मैदानावर उतरलेला भारतीय संघ अडचणीत सापडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 02:17 PM2022-12-04T14:17:09+5:302022-12-04T14:21:31+5:30

whatsapp join usJoin us
IND vs BAN 1st ODI Live Update : 19, 0, 2, 0 - score line of our all rounders, India 152 for 4 to 156 for 8; Shakib Al Hasan now has five as India have fallen away to 156/8, Will India make it through their 50 overs?   | IND vs BAN 1st ODI : १९, ०, २,० ! ४ धावा ४ विकेट्स, भारताचे ऑलराऊंडर ठरले फेल; ५० षटकं पूर्ण खेळण्याचे झालेत वांदे

IND vs BAN 1st ODI : १९, ०, २,० ! ४ धावा ४ विकेट्स, भारताचे ऑलराऊंडर ठरले फेल; ५० षटकं पूर्ण खेळण्याचे झालेत वांदे

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Bangladesh 1st ODI Live Update : वन डे वर्ल्ड कप २०२३ च्या तयारीचा निर्धार करून मैदानावर उतरलेला भारतीय संघ अडचणीत सापडला. रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर आणि शिखर धवन हे स्टार आज फेल गेले. शाकिब अल हसनने पाच विकेट्स घेऊन टीम इंडियाला बॅकफूटवर फेकले. लोकेश राहुल ( KL Rahul) एकटा खिंड लढवताना दिसतोय. कर्णधार रोहित शर्मा आज चार अष्टपैलू खेळाडूंना घेऊन मैदानावर उतरला, परंतु त्यांनी माना टाकल्या. 

रोहित व शिखर धवन ही नियमित जोडी सलामीला मैदानावर उतरली आणि लोकेश यष्टींमागे दिसणार आहे, कुलदीप सेनने आजच्या सामन्यातून पदार्पण केले आहे. रोहित-धवनने संयमी सुरुवात केली आणि चौथ्या डावात बांगलादेशने फिरकीपटू मेहिदी हसनला गोलंदाजीला आणले. त्याने सहाव्या षटकात भारताला पहिला धक्का दिला. धवन रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात ७ धावांवर त्रिफळाचीत झाला. रोहित व विराट कोहली यांनी चांगली खेळी केली होती, परंतु शाकिब अल हसनने एकाच षटकात दोघांना बाद केले. त्याने रोहितला ( २७) त्रिफळाचीत केले, तर तिसऱ्या चेंडूवर विराटचा ( ९) लिटन दासने अफलातून झेल घेतला. भारताचे आघाडीचे तीनही फलंदाज ४९ धावांवर माघारी परतले.


श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल यांनी सावध खेळ करताना भारताला आशेची किरण दाखवली होत. या दोघांची ५६ चेंडूंत ४३ धावांची भागीदारी इबादत होसैनने संपुष्टात आणली. श्रेयस २४ धावांवर झेलबाद झाला. लोकेश संभाळून खेळत होता आणि यावेळेस त्याला वॉशिंग्टन सुंदरची चांगली साथ मिळाली. सुंदरने किवी दौऱ्यावर मिळालेल्या संधीत चांगली फटकेबाजी केली होती. आज त्याने लोकेशसह पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. लोकेशनेही ४९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पण, शाकिब अल हसन पुन्हा टीम इंडियाच्या आडवा आला अन् सुंदरला त्याने १९ धावांवर माघारी पाठवून लोकेशसह ६० धावांची भागीदारी संपुष्टात आणली. शाहबाद अहमद आला तसा गेला, शाकिबने अप्रतिम झेल टिपला. भारताने १५३ धावांत ६ विकेट्स गमावल्या. 


शाकिबने त्यानंतर दोन धक्के दिले. शार्दूल ठाकूर ( २) व दीपक चहर ( ०) यांना त्याने बाद करताना डावात पाच विकेट्स घेतल्या. भारताची अवस्था ३४.४ षटकांत ८ बाद १५८ अशी झालीय आणि ते ५० षटकं तरी खेळून काढतील का अशी शंका निर्माण झालीय. १५२ वर चौथी विकेट पडली आणि त्यानंतर १५८ पर्यंत चार धक्के बसले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: IND vs BAN 1st ODI Live Update : 19, 0, 2, 0 - score line of our all rounders, India 152 for 4 to 156 for 8; Shakib Al Hasan now has five as India have fallen away to 156/8, Will India make it through their 50 overs?  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.