Join us  

IND vs BAN 1st ODI : KL Rahul लढवतोय खिंड! भारताचे सहा फलंदाज १५३ धावांवर परतले माघारी, शाकिबची लैय भारी कामगिरी

India vs Bangladesh 1st ODI Live Update : वन डे वर्ल्ड कप २०२३ च्या तयारीचा निर्धार करून मैदानावर उतरलेला भारतीय संघ अडचणीत दिसतोय..

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2022 1:59 PM

Open in App

India vs Bangladesh 1st ODI Live Update : वन डे वर्ल्ड कप २०२३ च्या तयारीचा निर्धार करून मैदानावर उतरलेला भारतीय संघ अडचणीत दिसतोय... रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर आणि शिखर धवन हे स्टार आज फेल गेले आणि भारताचा निम्मा संघ १५२ धावांत तंबूत परतला. शाकिब अल हसनने तीन मोठ्या विकेट्स घेतल्या. लोकेश राहुल ( KL Rahul) एकटा खिंड लढवताना दिसतोय... 

Virat Kohli ला 'शॉक' लागला, लिटन दासने अफलातून झेल घेतला! शाकिबच्या ३ चेंडूंत २ विकेट्स, Video 

रोहित व शिखर धवन ही नियमित जोडी सलामीला मैदानावर उतरली आणि लोकेश यष्टींमागे दिसणार आहे, कुलदीप सेनने आजच्या सामन्यातून पदार्पण केले आहे. रोहित-धवनने संयमी सुरुवात केली आणि चौथ्या डावात बांगलादेशने फिरकीपटू मेहिदी हसनला गोलंदाजीला आणले. त्याने सहाव्या षटकात भारताला पहिला धक्का दिला. धवन रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात ७ धावांवर त्रिफळाचीत झाला. रोहित व विराट कोहली यांनी चांगली खेळी केली होती, परंतु शाकिब अल हसनने एकाच षटकात दोघांना बाद केले. त्याने रोहितला ( २७) त्रिफळाचीत केले, तर तिसऱ्या चेंडूवर विराटचा ( ९) लिटन दासने अफलातून झेल घेतला. भारताचे आघाडीचे तीनही फलंदाज ४९ धावांवर माघारी परतले. श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल यांनी सावध खेळ करताना भारताला आशेची किरण दाखवली होत. या दोघांची ५६ चेंडूंत ४३ धावांची भागीदारी इबादत होसैनने संपुष्टात आणली. श्रेयस २४ धावांवर झेलबाद झाला. लोकेश संभाळून खेळत होता आणि यावेळेस त्याला वॉशिंग्टन सुंदरची चांगली साथ मिळाली. सुंदरने किवी दौऱ्यावर मिळालेल्या संधीत चांगली फटकेबाजी केली होती. आज त्याने लोकेशसह पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. लोकेशनेही ४९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पण, शाकिब अल हसन पुन्हा टीम इंडियाच्या आडवा आला अन् सुंदरला त्याने १९ धावांवर माघारी पाठवून लोकेशसह ६० धावांची भागीदारी संपुष्टात आणली. शाहबाद अहमद आला तसा गेला, शाकिबने अप्रतिम झेल टिपला. भारताने १५३ धावांत ६ विकेट्स गमावल्या.   

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशलोकेश राहुलविराट कोहली
Open in App