India vs Bangladesh 1st ODI Live Update : २०२३च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेला आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात होतेय, कारण संघातील सीनियर खेळाडू परतले आहेत. भारत-बांगलादेश यांच्यातली पहिली वन डे मीरपूर येथे आज खेळवली जात आहेत. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रिषभ पंतचा ( Rishabh Pant) फॉर्म हा सर्वांसाठी चर्चेचा विषय होता, त्याला सातत्याने संधी देऊनही काही खास करता आलेले नाही. अशात बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात त्याला संघात स्थान तर मिळाले नाहीच, शिवाय त्याला वन डे मालिकेतूनच बाहेर बसवण्याचा निर्णय BCCI ने घेतला.
वडील चालवतात सलून, पोराने मिळवलं टीम इंडियाचं तिकीट, रोहितने उतरवला ४ ऑलराऊंडरचा संघ
बांगलादेशला १९८८ पासून भारताविरुद्ध केवळ पाच वन डे सामने जिंकता आले आहेत. २०१५मध्ये बांगलादेशने भारतावर अखेरचा विजय मिळवला होता.
मालिकेपूर्वी रवींद्र जडेजा, यश दयाल यांनी माघार घेतली आणि काल मोहम्मद शमीला माघार घेतल्यानं भारतासमोर तगडा संघ मैदानावर उतरवण्याचे ध्येय आहे.
रिषभ पंतने मागील सहा वन डे सामन्यांत १०, १५, १२५, ०, ५६ आणि १८ धावा केल्या आहेत. वन डेतील कामगिरी ही ट्वेंटी-२० पेक्षा चांगली झालेली आहे. त्याने २०२२मध्ये १२ वन डे सामन्यांत २२३ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात बाद झाल्यानंतर रिषभ पंत ड्रेसिंग रुममध्ये पाठीवर उपचार घेतानाचा फोटो व्हायरल झाला आणि त्यामुळे त्याच्या बांगलादेश दौऱ्याला मुकण्याची चर्चा सुरू झाली होती. चार दिवसांनी सुरू होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत रिषभ दुखापतीतून सावरण्याची शक्यता कमी होती आणि तसेच घडले.
बीसीसीआयने ट्विट करून माहिती दिली की, रिषभ पंत वन डे मालिकेत खेळणार नाही, तो कसोटी मालिकेसाठी उपलब्ध असेल. अक्षर पटेल यालाही दुखापतीमुळे पहिल्या वन डेत खेळता येणार नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"